सुरक्षित गुंतवणुकीसह दुप्पट परतावा मिळेल, फक्त सरकारच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करा |Kisan Vikas Patra Scheme in Marathi

मित्रांनो गुंतवणूक हा शहाणपणाचा निर्णय मानला जातो. वाईट काळात आपले गुंतवलेले पैसे कामाला येतात.पण गुंतवणुकीबाबत प्रत्येक दुसरी व्यक्ती परेशानीत आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली गुंतवणूक सुरक्षित असावी असे वाटते. एवढेच नाही तर सुरक्षित गुंतवणुकीसह दुप्पट मॅच्युरिटी मिळाली तर ते सोन्याहून पिवळ. मित्रांनो तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत जिथे तुम्हाला हे दोन्ही फायदे मिळतात.

सुरक्षित गुंतवणुकीसह दुप्पट परतावा मिळेल, फक्त सरकारच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करा |Kisan Vikas Patra Scheme in Marathi

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना

गुंतवणुकीसाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Scheme) निवडू शकता. ही योजना भारत सरकारची एकवेळची गुंतवणूक योजना (one time investment scheme) आहे. म्हणजेच योजनेत एकदाच गुंतवणूक करावी लागते. चांगली बाब म्हणजे केंद्र सरकारने यावर्षी 1 एप्रिलपासून या योजनेसाठी व्याजदरात वाढ केली आहे.

या योजनेतील गुंतवणुकीचे नियम काय आहेत?

  • तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता.
  • योजनेत तुम्हाला सिंगल आणि जॉइंट अकाउंटची सुविधा मिळते.
  • जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या नावाने खाते उघडू शकता.
  • ही योजना HUF किंवा NRI वगळता सर्वांसाठी उपलब्ध आहे.
  • या योजनेत तुम्ही रु. 1000, रु. 5000, रु. 10,000 आणि रु. 50,000 ची गुंतवणूक करू शकतात.

हे सुध्दा वाचा:- आता पूर आणि पावसामुळे शेतकऱ्यांना टेन्शन नाही! सरकार भरपाई देईल, सरकारची ही योजना करेल मदत

मॅच्युरिटीवर कसा मिळेल दुप्पट परतावा

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत आता व्याजदर 7.5 टक्के करण्यात आला आहे. योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होतात. योजनेत 2 लाख रुपये गुंतवल्यास 115 महिन्यांत दुप्पट रक्कम म्हणजेच 4 लाख रुपये मिळतील.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button