स्वामी विवेकानंद यांच्या ‘या’ विषयावर लेख लिहा आणि जिंका 10000 रुपये बक्षीस |Ignou national photo feature competition 2023

मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) राष्ट्रीय छायाचित्रण (फोटो फीचर) स्पर्धा आयोजित करत आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावर लेख लिहून तीन फोटो क्लिक करावी लागतील.

फोटो क्लिक करण्यासोबतच कॅप्शनही लिहावे लागतील ते पण तरुणांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांचे विचार किंवा विधान चित्रांशी जुळवून लिहावे लागेल. फोटो फीचर स्पर्धेसाठी फोटो फीचर्स पाठवण्याची अंतिम तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहितीसाठी IGNOU वेबसाइट http://rcnoida.ignou.ac.in/ ला भेट द्या.

स्वामी विवेकानंद यांच्या या विषयावर लेख लिहा आणि जिंका 10000 रुपये बक्षीस |Ignou national photo feature competition 2023

फोटो फीचर कसे पाठवायचे?

इग्नूच्या फोटो फीचर स्पर्धेत फोटो फीचर majem@ignou.ac.in या इमेल आयडीवर मेल करावे लागेल. अधिक माहितीसाठी डॉ.अमित कुमार यांच्याशी 9911773651 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. फोटो फीचर पाठवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे फोटोशी जुळणारे स्वामी विवेकानंदांचे विचार कॅप्शन म्हणून लिहावेत. स्पर्धकांनी त्यांचे तपशील फोटो फीचरसह आणि मेलमध्ये त्यांच्या विद्यार्थी आयडीची स्कॅन देखील पाठवायचे आहे.

हे सुध्दा वाचा:- जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर फक्त बायोकडे लक्ष देऊ नका, या विषयाकडेही लक्ष द्या

फोटो फीचरबद्दल महत्वाचे मुद्दे काय आहेत?

image credit -http://rcnoida.ignou.ac.in/
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप
  • फोटो फीचर पाठवण्याची अंतिम तारीख – 27 डिसेंबर 2023
  • स्पर्धेचा निकाल – 12 जानेवारी 2023 रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 10,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र मिळेल.
  • दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 7000 रुपयांचे रोख प्रमाणपत्र मिळेल.
  • तिसरे स्थान मिळविल्यास, तुम्हाला 5,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र मिळेल.
  • याशिवाय तीन सांत्वन बक्षिसेही दिली जाणार आहेत. 2 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक असेल.
  • आणखी 50 निवडक सहभागींना गुणवत्ता सहभाग प्रमाणपत्रे दिले जातील.
Telegram Grouplink
WhatsApp Channellink

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button