EPFO ने EPS अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन कॅल्क्युलेटर (higher pension calculator) काढले आहे. याच्या मदतीने त्यांना अधिक पेन्शन मिळविण्यासाठी किती पैसे जमा करावे लागतील याची ते सहजपणे गणना करू शकणार आहे. जेव्हा पासून EPFO ने अधिक पेन्शनसाठी अर्ज मागवले आहेत तेव्हापासून कर्मचाऱ्यांमध्ये वाढीव निवृत्ती वेतनासाठी योगदानाव्यतिरिक्त किती रक्कम जमा करायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
कर्मचार्यांची प्रतीक्षा संपली, पेन्शन मोजण्यासाठी EPFO ने लॉन्च केला नवीन कॅल्क्युलेटर | How to use higher pension calculator in marathi
EPFO चे उच्च पेन्शन कॅल्क्युलेटर कसे डाउनलोड करावे?

- यासाठी EPFO च्या सदस्यना सेवा पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
- त्यानंतर पेन्शन अर्ज लिंकवर क्लिक करावं लागेल.
- आणि नंतर तुम्हाला त्या लिंक्समध्ये कॅल्क्युलेटर मिळेल.
EPFO कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

- मित्रांनो हे कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी कर्मचाऱ्याला ईपीएफमध्ये लॉगिन होण्याची तारीख माहित असणे आवश्यक आहे. यानंतर कर्मचाऱ्याला पगाराची रक्कम लिहावी लागेल. जेव्हापासून तो या योजनेत सामील झाला आहे.
- जर तुम्ही नोव्हेंबर 1995 पूर्वी EPS मध्ये सामील झाला असाल तर तुम्हाला नोव्हेंबर 1995 आणि त्यानंतरचा पगार लिहावा लागेल.

- पगाराची माहिती फेब्रुवारी 2023 मध्ये किंवा तुमची सेवानिवृत्ती, यापैकी कोणतीही तारीख आधी द्यावी लागेल. तुम्ही सर्व माहिती भरताच अतिरिक्त योगदान देण्यासाठी रक्कम तुमच्या समोर येईल.
- सरकारने 3 मे 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये उच्च निवृत्ती वेतनासाठी 1.16 टक्के अतिरिक्त योगदान दिले जाईल असे म्हटले होते.
हे सुध्दा वाचा:- सॅलरी ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? सॅलरी ओव्हरड्राफ्ट हा क्रेडिट कार्डचा पर्याय असू शकतो?
- EPF कायद्यानुसार पगाराच्या 12-12 टक्के रक्कम नियोक्ता आणि कर्मचारी यांना EPF खात्यात जमा करावी लागते. कर्मचाऱ्यांचा 12 टक्के हिस्सा हा ईपीएफ खात्यात जातो.
- 12 टक्के नियोक्त्याचा वाटा, 8.33 टक्के EPS खात्यात (पगार कमाल मर्यादेच्या अधीन) आणि उर्वरित 3.67 टक्के वाटा हा EPF खात्यात जातो.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.