क्रेडिट कार्डबाबत या 5 चुका कधीही करू नका, नाहीतर काही खर नाही |How to avoid credit card debt in marathi

मित्रांनो क्रेडिट कार्ड (credit card) वापरणारा युजर्स अनेक वेळा या 5 चुका करतो. या चुकांचा परिणाम असा होतो की आपण कायमचे कर्जात बुडून जातो. अशा परिस्थितीत आपण या चुका जाणून घेतल्या पाहिजेत. जेणेकरून आपण या कर्जाच्या सापळ्यात कधीही अडकू शकणार नाही. या चुका टाळल्या तर तुमचा क्रेडिट स्कोअर कधीच खराब होणार नाही. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.

क्रेडिट कार्डबाबत या 5 चुका कधीही करू नका, नाहीतर काही खर नाही |How to avoid credit card debt in marathi

किमान पैसे द्या

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असल्यास तुम्ही नेहमी किमान पेमेंट केले पाहिजे. कर्ज फेडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंटची जास्त रक्कम ठेवली तर तुम्हाला भविष्यात आणखी कर्जाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही किमान पेमेंट केल्यास तुमचे व्याज कव्हर केले जाईल. तसे आपण कधी पण पूर्ण पैसे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण यामुळे आपल्याला कधीही कर्जाच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

उशीरा पेमेंट करु नका

आपण कधी कधी कार्डचे पेमेंट उशीरा करतो. पण मित्रांनो अस करणे आपण टाळले पाहिजे. जेव्हा आपण उशीरा पैसे भरता तेव्हा आपल्याला लेट फी देखील भरावे लागते. तुमच्या क्रेडिट कार्डचा व्याजदरही वाढू शकतो आणि तुमचा क्रेडिट स्कोरही खराब होऊ शकतो. तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरताना तुम्हाला काही समस्या आल्यास तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधू शकता.

क्रेडिट कार्ड वापरणे बंद करा

जेव्हाही तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकता तेव्हा तुम्ही सर्वप्रथम क्रेडिट कार्ड वापरणे बंद केले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे कर्ज वाढेल ज्याची परतफेड करताना तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी त्याची परतफेड करण्यावर भर द्या.

क्रेडिट कार्ड स्टेटमेंटकडे लक्ष द्या

तुमच्या खर्चाचा नजर ठेवण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड स्टेटमेंटकडे लक्ष द्यावे लागेल. यावरून तुम्ही किती खर्च करता आणि तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील तसेच व्याजदर आणि शुल्क हे जाणून घेता येईल. तुमच्या स्टेटमेंटचे पुनरावलोकन केल्याने तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड करण्यात मदत होऊ शकते.

क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधा

जेव्हा आपण कर्जात बुडतो तेव्हा आपण क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधला पाहिजे. कधीकधी कंपनी आपल्याला यामध्ये मदत करते. मित्रांनो मदत मागायला कधीही संकोच करू नये.

हे सुध्दा वाचा:- Car loan घेण्यापूर्वी, फिक्स्ड आणि फ्लोटिंग व्याजबद्दल नक्की जाणून घ्या

या गोष्टी लक्षात ठेवा

  • क्रेडिट कार्ड पेमेंट करताना तुम्ही तुमचे बजेट लक्षात ठेवावे.
  • तुम्ही आधी लहान कर्ज फेडले पाहिजे. त्यानंतर तुम्ही मोठे कर्ज फेडले पाहिजे.
  • क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही एखाद्या तज्ञाचा सल्ला देखील घेऊ शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button