Reliance jio युजर्स अशा प्रकारे 4G वरून 5G वर मायग्रेट करा, फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा |How to activate Jio 5G on your smartphone

मित्रांनो प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 5G सेवा आता भारतात उपलब्ध झाली आहे आणि ही सेवा काही शहरांमध्ये थेट सुरु झाली आहे. सध्या टेलिकॉम कंपनी Airtel आणि Jio चे यूजर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतात. पण 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी 5G फोन असणे देखील आवश्यक आहे. जिओ आणि एअरटेल या दोघांनीही पुष्टी केली आहे की 5G सेवा वापरण्यासाठी नवीन सिम कार्ड खरेदी करणे आवश्यक नाही परंतु 4G सिम अपडेट करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला Jio सिममध्ये 5G नेटवर्क कसे सक्रिय करायचे ते सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही सोप्या पद्धतीने 5G नेटवर्कचा आनंद घेऊ शकता.

Reliance jio युजर्स अशा प्रकारे 4G वरून 5G वर मायग्रेट करा, फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा |How to activate Jio 5G on your smartphone

Android फोनवर Jio 5G कसे ॲक्टिव्ह करायचं? |How to enable jio 5g in android

  • तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा.
  • तेथे “मोबाइल नेटवर्क” पर्याय शोधा. त्यावर टॅप करा.
  • जर तुमचा फोन ड्युअल सिम चालवत असेल तर Jio सिम निवडा आणि नंतर ‘Preferred Network Type’ पर्यायावर टॅप करा.
  • येथे, 5G निवडा आणि तुमचं काम झालं. तुमचं कार्ड 5g वर चालू झाल.

आयफोनवर Jio 5G कस ॲक्टिव्ह करायचं? |How to activate Jio 5G on iPhone

  • सेटिंग्ज पृष्ठावर जा.
  • नंतर “मोबाइल डेटा” निवडा
  • नंतर “व्हॉइस आणि डेटा” हा पर्याय निवडा.
  • आणि नंतर “5G Auto” तसेच “5G Standalone On” निवडा. आणि झालं तुमचं 5g network चालू.

हे सुध्दा वाचा:- जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर, मगं ही माहिती तुमच्यासाठी

फोननुसार सेटिंग्ज चेंज करा

Google Pixel स्मार्टफोनसाठी

/Stock Android फोन सेटिंग्ज: नेटवर्क आणि इंटरनेट > सिम > नेटवर्क प्रकार > 5G निवडा.

Samsung स्मार्टफोनसाठी

सेटिंग्ज > कनेक्शन > मोबाइल नेटवर्क > नेटवर्क मोड > 5G/LTE/3G/2G (ऑटोकनेक्ट) निवडा.

OnePlus स्मार्टफोनसाठी

सेटिंग्ज > वाय-फाय आणि नेटवर्क > सिम आणि नेटवर्क > नेटवर्क प्रकार निवडा > 2G/3G/4G/5G (स्वयंचलित).

Oppo/Realme फोनमध्ये ही सेटिंग करा

सेटिंग्ज > कनेक्शन आणि शेअरिंग > SIM 1 किंवा SIM 2 वर टॅप करा > नेटवर्क प्रकार निवडा > 2G/3G/4G/5G (स्वयंचलित).

Vivo/iQoo स्मार्टफोनसाठी

सेटिंग्ज > SIM 1 किंवा SIM 2 वर टॅप करा > मोबाइल नेटवर्क > नेटवर्क मोड > 5G मोड निवडा.

Xiaomi/Poco स्मार्टफोनसाठी

सेटिंग्ज > सिम कार्ड आणि मोबाइल नेटवर्क > नेटवर्क प्रकार > 5G निवडा.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button