डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित प्रेरणादायी माहिती तुम्हाला माहित आहे का? | Facts about dr babasaheb ambedkar

संविधानाचे शिल्पकार, अर्थक्रांतीचे जनक, सुशासनाचे महामेरू, समानता बंधूभावाच्या सुत्राचे अग्रणी डॉ. भीमराव आंबेडकर (Dr Babasaheb ambedkar) यांची आज जयंती आहे. डॉ.भीमराव आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 14 एप्रिल रोजी झाला होता. देशभरातील लोक बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित प्रेरणादायी माहिती तुम्हाला माहित आहे का? |Facts about dr babasaheb ambedkar

भारतरत्न आंबेडकर आयुष्यभर संघर्ष करत राहिले. भेदभावाला तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले आणि स्वतंत्र भारताला लोकशाही राष्ट्र बनवण्यासाठी संविधान निर्मितीत अमूल्य भूमिका बजावली. मागासलेल्या व दुर्बल घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक किस्से आहेत, ज्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr babasaheb ambedkar jayanti in marathi) त्यांच्या जीवनाशी संबंधित मनोरंजक गोष्टी जाणून घ्या.

सामाजिक आणि आर्थिक भेदभावात बालपण गेले

14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकर हे महार जातीचे होते. त्यामुळे त्यांचे बालपण भेदभावात गेले.

बाबासाहेबांचे शिक्षण

त्या काळात अस्पृश्यतेसारख्या समस्या प्रचलित होत्या, त्यामुळे त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणात खूप त्रास सहन करावा लागला. पण बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासात चांगले होते, त्यामुळे त्यांनी जातीच्या साखळ्या तोडून आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील एल्फिन्स्टन रोडवरील सरकारी शाळेत प्रवेश घेणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. पुढे 1913 मध्ये आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले. 1916 मध्ये बाबासाहेबांना त्यांच्या संशोधनासाठी सन्मानित करण्यात आले.

हे सुध्दा वाचा:- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कारकीर्द

लंडनमध्ये शिकत असताना त्यांची शिष्यवृत्ती संपल्यावर ते घरी आले आणि मुंबईतील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले तरी त्यांना येथेही जात आणि समानतेचा सामना करावा लागला. त्यामुळे बाबासाहेबांनी दलित समाजाला समान हक्क मिळवून देण्याचे काम सुरू केले. त्यांनी ब्रिटीश सरकारकडे स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती, ती मंजूरही झाली होती, परंतु गांधीजींनी विरोध म्हणून आमरण उपोषण केले तेव्हा आंबेडकरांना आपली मागणी मागे घ्यावी लागली.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button