कर्नाटकचे मंत्री उमेश कुट्टी यांच्या बद्दल तुम्हाला माहिती?

उमेश कुट्टी यांचे वडील विश्वनाथ कट्टी यांच्या निधनानंतर 1985 च्या पोटनिवडणुकीत कट्टी पहिल्यांदा विधानसभेवर ते निवडून आले. 

जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांची पहिली निवडणूक होती. 

ते 1989 आणि 1994 मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून आणि 1999 मध्ये जनता दल (युनायटेड) उमेदवार म्हणून निवडून आले.

2004 च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झाले.

उमेश कट्टी  हे 2008 मध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) उमेदवार म्हणून निवडून आले पण ते भाजपमध्ये गेले. 

2008 च्या पोटनिवडणुकीत, 2013 च्या निवडणुकीत आणि 2018 च्या निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले.

हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून 5 वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते. 

जे एच पटेल, बी एस येडियुरप्पा, डी. व्.ही सदानंदगौडा, जगदीश शेट्टार आणि बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते.

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद