आशिकी फ्रँचायझी बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

1990 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आशिकी’ हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता.

या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसले होते. 

या चित्रपटानंतर दोघेही रातोरात प्रसिद्ध झाले. यानंतर 2013 मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी 2’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. 

या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. 

 हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

आता कार्तिक आर्यन 'आशिकी 3' या हिट फ्रँचायझी चित्रपटाचा भाग असणार आहे.

मात्र, या चित्रपटात अभिनेत्री कोण असणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 

‘आशिकी 3’चे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत.

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद