डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

अत्यंत आकर्षक, गुणकारी व मधुर असे डाळिंब सर्वश्रेष्ठ फळांमधील एक फळ आहे. 

 कठीण कवचाप्रमाणे साल असलेले डाळिंब लाल, सफेद अशा दोन प्रकारामध्ये आढळते.

गोड डाळिंबे तृषाशामक, उष्णताहारक व पित्तहारक असतात. डाळिंब पित्तशामक असल्याने त्यांचा पित्तविकारामध्ये फार उपयोग होतो. 

पित्तज्वर आलेल्या माणसाला डाळिंबाचा रस दिल्याने फायदा होतो. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णताही नाहीशी होते. 

डाळिंब मूत्रदोषहारक, रुचकर, वात-पित्तशामक व उलटी बंद करणारे असते. 

डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने नाकामधून रक्त पडण्याचे बंद होते. तसेच मूळव्याधींच्या त्रासामध्येही फायदा होतो.

डाळिंबाची साल पाण्यात उगाळून दिल्यास लहान मुलांची अतिसारापासून सुटका करता येते.

डाळिंब रसाचे चाटण लहान मुलांना चाटवल्याने खोकला बरा होतो.

डाळिंबाचे मूळ उगाळून त्याचा लेप गजकर्ण व इसब यासारख्या त्वचा विकारामध्ये लावला असता उपयोग होतो.

Next: आवळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? 

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद