आवळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

आरोग्याच्या दृष्टीने ‘आवळा' हे श्रेष्ठ फळांमधील एक फळ आहे. आहारामध्ये आपण आवळ्याचा लोणचे, मुरांबा, छंदा, अवलेह आदी प्रकारातून उपयोग करतो. 

आयुर्वेदाने औषधांमध्ये आवळ्याला फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. कोणत्याही हवामानामध्ये आवळा हा शरीराला आरोग्यदायीचं ठरतो.

आवळ्यामध्ये 'क' अर्थात 'सी' जीवनसत्त्व असते.

आवळा आंबट, मधुररसाने युक्त व कडवट अशा संमिश्र चवीचा असतो. 

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो. दृष्टी सुधारते, मलावरोधाचा त्रास नाहीसा होतो व पोट जड राहणे, भूक न लागणे आदी विकारही बरे होतात.

आवळ्याचे चूर्ण, साखर व गायीच्या दुधाचे तूप समप्रमाणात घेऊन एकत्र करावे व ते सकाळी अनशापोटी खाल्ले असता मस्तकशूळ बरा होतो.

थंड हवामानामध्ये कच्चे आवळे खाणे आरोग्यासाठी हितावह नसते. थंड प्रकृतीच्या माणसांनी आवळ्याचा उपयोग जाणीवपूर्वकच करावा.

आवळ्यामुळे रक्तातील उष्णता आटोक्यात आणली जाते. तसेच रक्तशुद्धीही होते. या मधील औषधी गुणधर्म पेशींचे शुद्धीकरण करतात.

 पिकलेले, ताजे आवळे घेऊन त्यांचा रस दररोज सकाळी रिकाम्या पोटी नियमित घेतल्याने शरीर धष्टपुष्ट होते. आवळ्यामध्ये शक्तिवर्धक गुण आहे.

Next: जांभूळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद