तुमचा स्मार्टफोन स्लो झालाय का? मग या टीप्स फॉलो करा...

आपण जेव्हा कोणतीही वेबसाईट सर्च करता तेव्हा त्यातला काही डेटा हा रॅममध्ये cache च्या स्वरुपात स्टोर होतो.

पुढच्यावेळी सर्च करताना url लवकरात लवकर लोड व्हावी म्हणून हे cache स्टोर होतं असतं. 

यामुळे स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन cache किंवा जंक फाईल्स वारंवार डिलीट केल्या पाहिजेत. जेणेकरुन, तुमच्या स्मार्टफोनची स्पीड वाढेल.

अनेकदा आपण अशा अ‍ॅप्सना आपल्या स्मार्टफोनमध्ये स्थान देतो की ज्यांचा वापर करत नाहीत. जसं की, जेवण ऑर्डर करणे, फोटो एडिट करणे अशा कामांसाठी आपण काही अ‍ॅप्स डाऊनलोड करतो.

या अ‍ॅप्सचा वापर झाल्यानंतर देखील या अ‍ॅप्स स्मार्टफोनमध्ये स्टोरेज साठवून ठेवतात.

अशा अ‍ॅप्सला अनइनस्टॉल केल्याने स्टोरेजची जागा वाढेल आणि जर अ‍ॅप अनइनस्टॉल होत नसेल तर त्यांना सेटिंगमध्ये जाऊन डिसेबल करु शकतात.

तुमचा स्मार्टफोन हा अँड्रॉईड असो की आयओएस प्रत्येक सिस्टीमला आधुनिक करण्यासाठी कंपनी सिस्टीम अपडेट करते.

तुमच्या स्मार्टफोनला अपडेट आलेला असेल तर तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपडेट करायला हवा, जेणेकरुन तुमच्या स्मार्टफोनची स्लो स्पीड फास्ट होऊ शकते

तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज कमी असेल किंवा तुमचा स्मार्टफोन जर जुना असेल तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे कमी साईज असलेले अ‍ॅप्स वापरणे.

रोज ज्या अ‍ॅप्सचा वापर होत असेल जसं की, इंस्टाग्राम, फेसबूक, व्हाट्सअ‍ॅप यांसारख्या अ‍ॅप्सचे लाईट व्हर्जन वापरल्याने तुमचा स्टोरेजचा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि तुमचा स्मार्टफोन जास्त स्पीडने काम करेल.

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद