आंब्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

आंब्याचे मूळ रूप कैरी, कैरी पिकल्यावर आंबा तयार होतो. कैरीचा प्रामुख्याने उपयोग लोणचे, मोरंबा यामध्ये होतो. कैरीचे पन्हेही बनवले जाते.

लहान- कच्ची कैरी आंबट, तुरट, वायूकारक व पित्तकारक असते. मोठी कच्ची कैरी त्रिदोषकारक असते.

कच्च्या कैरीपासून बनवलेला मुरांबा चविष्ट व पौष्टिक असतो तसेच तो तोंडाला रुची आणतो व पित्तही नाहीसे करतो. परंतु कच्च्या कैरीमुळे मंदाग्नी, मलावरोध, रक्ताचे व पोटाचे विकारही होऊ शकतात.

पिकलेल्या गोड आंब्यामध्ये 'ए' व 'सी' जीवनसत्त्व असते. जंतुनाशक व त्वचारोगहारक असाही त्याचा उपयोग होऊ शकतो.

पिकलेला आंबा पचायला थोडा जड, थंड, पित्तकारक व थोडासा कफवर्धक असतो. शरीरात रसधातू निर्माण करणारा आंबा अस्थी, मेद, मज्जा, शुक्र आदी धातूंची वृद्धी करतो.

पचनसंस्थेचे रोग, फुप्फुसाचे रोग, आमाशयाचे रोग, रक्ताची कमतरता यावर आंब्याचा औषध म्हणून उपयोग होतो.

पिकलेला आंबा बलवर्धक, पोट स्वच्छ ठेवणारा, चरबी वाढवणारा असून मृदू रेचकही असल्याने शौचास साफ होते.

आमरसाच्या सेवनाने अरुची, आम्लपित्त, आतड्यांचे रोग, यकृतासंबंधीच्या विकारांमध्येही फायदा होतो.

आंब्याच्या सेवन केल्याने मेदाचे प्रमाण वाढते तसेच दुधाबरोबर सेवन केल्याने वीर्यवृद्धी होते.

आंब्याच्या कोयीमधून निघालेले तेल संधिवातावर उपयोगी ठरते.

Next:अननस खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद