आले खाण्याचे फायदे 

तुम्हाला माहित आहे का?

nitin rathod

Scribbled Underline

 1

अरुची वाढणे, गॅसचा त्रास, करपट ढेकरा येणे, अपचन, भूक न लागणे, मलावरोध होणे यांवर सोपा उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात तेवढाच लिंबाचा रस घेऊन त्यात थोडे सैंधव घालून रोज सकाळी प्यावे.

Scribbled Underline

 2

आले व कांद्याचा रस एकत्र करून चमचाभर प्यायल्याने उलटी बंद होते.

Scribbled Underline

 3

आल्याचा व पुदिन्याचा काढा करून ताप आलेल्या व्यक्तीस दिल्याने धाम येतो व तापही उतरतो. थंडी वाजून ताप आल्यास या काढ्याचा वापर केला असता गुण येतो.

Scribbled Underline

 4

आलेपाकामध्ये वेलची, जायफळ व लवंग घालून हा पाक बरणीमध्ये भरून ठेवावा. दररोज थोडा थोडा पाक आहारात घेतला असता अग्नीमांद्य, अरुची, कफविकार, वायूविकार, आमवृद्धी यांवर फायदा होतो.

Scribbled Underline

5

अंग थंड पडले असेल तर लसूण व आले एकत्र करून त्याचा रस काढून अंगाला चोळल्याने अंगात उष्णता येते.

Scribbled Underline

6

आल्याचा रस गरम करून नंतर त्याचे कोमट थेंब कानात घातल्याने ठणका मारणे बंद होते.

Scribbled Underline

7

लहान मुलांना दूध पचत नसेल तर दूध उकळवताना त्यात आले टाकून ते दूध दिले असता चांगले पचते.

Scribbled Underline

8

आवाज बसला असता किंवा घसा दुखत असेल तेव्हा आले, लवंग व मीठ एकत्र करून खावे.

Scribbled Underline

9

आल्याचा रस खडीसाखरे बरोबर घेतल्यास भोवळ येणे, चक्कर येणे बंद होते.

Scribbled Underline

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मेथी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?