मेथी खाण्याचे फायदे 

तुम्हाला माहित आहे का?

nitin rathod

Scribbled Underline

 1

मेथी हे उत्तम दर्जाचे टॉनिक आहे. मेथीचे गुणधर्म वातहारक, वायुनाशक,वीर्यवर्धक, रक्तशुद्धीकारक व रसधातूपोषक असे आहेत.

Scribbled Underline

 2

थंडीमध्ये बहुधा वातविकार उफाळून येतात. अशा वेळेस सांधे दुखणे, आमवात, अंग मोडून येणे या सारखे विकार बळावतात. मेथीच्या सेवनाने उदाहरणार्थ मेथीची भाजी, मेथीयुक्त पाणी, मेथीचे लाडू व मेथीचे लोणचे यांचा आहारामध्ये समावेश केल्याने फायदा होतो.

Scribbled Underline

 3

दिवसातून मेथीचा लाडू किमान एक तरी खावा. अंगदुखीवर अत्यंत गुणकारी असा मेथीचा लाडू बाळंतिणीस तर अवश्य द्यावा. त्यामुळे वातविकारांचा त्रास न होता अंगात शक्तीही येते. बाळंतपणानंतर येणाऱ्या वातविकारांच्या त्रासापासूनही मुक्तता मिळते.

Scribbled Underline

 4

मेथीपाकाच्या सेवनामुळे वातरोग, संधिवात, आमवात, आम्लपित्त, बाळंतरोग व नेत्ररोग यांवर नियंत्रण राखले जाते. शरीर संगोपनासाठी सकाळ-संध्याकाळ चमचाभर मेथीपाक दुधाबरोबर घ्यावा. शरीर संवर्धनासाठी मेथी तेलाचाही उपयोग केला जातो.

Scribbled Underline

5

मेथीच्या कोवळ्या पानांच्या भाजीचाही आहारामध्ये अंतर्भाव असणे आत्यंतिक जरुरीचे आहे. मलावरोधासारखे विकार दूर राखले जातात. पोट साफ राहते आणि रक्तशुद्धीचेही कार्य त्यामुळे होते.

Scribbled Underline

6

रोजच्या आहारामध्ये मेथीचा वापर या ना त्या मार्गाने झालाच पाहिजे. मेथी घातलेल्या चपात्या, मेथीची भाजी, ठेपला, मुठिया, लोणचे, लाडू या मार्गाने मेथी आपल्या पोटामध्ये जाणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मेथी चवीला जरी कडू असली तरी तिचे कार्य शरीराच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असे आहे.

Scribbled Underline

7

रोज सकाळी थोडी थोडी मेथी खाल्ल्याने वायूविकार दूर होतो.

Scribbled Underline

8

 मेथी व सुंठेचे चूर्ण गुळात मिसळून दिवसातून दोनदा घेतल्यास आमवात दूर होतो. आमवातावर याचा चांगलाच फायदा होतो.

Scribbled Underline

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: आवळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?