हिंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

हिंग गॅसनाशक आहे, वेदनाशामक आहे, पाचक आहे आणि कृमिनाशकही आहे. हिंगाचा औषधासाठीचा उपयोग चरकसंहिता, निघण्टू, रत्नाकर आदी आयुर्वेदामधील ग्रंथामध्येही लिहिला गेला आहे.

डोळ्यांच्या त्रासामुळे डोकेदुखी उद्भवते. अशा वेळी हिंगाचा उपयोग केलेल्या 'हिंग्वाभाघृत' मुळेही डोळ्यांच्या विकारांवर आराम पडतो.

मुलांना पोटामध्ये कळ येऊन दुखत असेल तर बेंबीजवळ हिंगाचा लेप दिला असता वायू बाहेर पडून जातो व आराम वाटतो.

हिंगाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून तुपाबरोबर खाल्ल्याने अजीर्ण व वातगोळा दूर होतो.

हिंग कापसामध्ये गुंडाळून कानात ठेवल्यास दडे बसण्यामुळे होणारा त्रास आटोक्यात येतो. भाजलेला हिंग कापसात गुंडाळून दुखऱ्या दाताखाली ठेवल्यास दात किडल्याने, दात दुखू लागल्याने होणारा त्रास बरा होतो. 

 हिंग पाण्यात घालावा व ते पाणी थेंब, दोन थेंब नाकात सोडले असता अर्धशिशीवर आराम मिळतो. हिंग तिळाच्या तेलात घालून गरम करावा व कोमट झाल्यावर कानात चार-पाच थेंब घातल्यास कान दुखणे थांबते.

हिंग उष्ण असल्याने पित्तप्रकोपाचा त्रास असणाऱ्यांनी हिंगाचे सेवन जरा जपूनच करावे.

Next: आवळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? 

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद