मित्रांनो जेईई मेनवर मोठी बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन सेशन 2 च्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत.
जेईई मेन ॲडमिट कार्ड 2024 आणि परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी हा मोठा बदल करण्यात आला आहे. jeemain.nta.nic.in या website वर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वी, JEE Mains सत्र 2 च्या परीक्षेच्या तारखा 4 एप्रिल 2024 पासून सुरू होऊन 15 एप्रिलपर्यंत निर्धारित केल्या होत्या, आता असे होणार नाही.
JEE Mains 2024 च्या ताज्या सूचनेनुसार, आता दुसऱ्या सत्रासाठी, JEE Main एप्रिल 2024 ची परीक्षा 4 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीतच घेतली जाईल.