वाय-फाय म्हणजे काय ? | Wifi information in marathi

तुझ्याकडे डेटा असेल तर हॉटस्पॉट चालू कर ना.”भावा मूव्ही अर्धाच डाऊनलोड झाला, डेटा संपला यार. मी वायफायशी जोडतो.” असे आपले मित्र नेहमीच लाडीगोडीत म्हणतात. कालच माझे रुममेट म्हणाले आपण वाय फाय कनेक्शन बसवूया ना सर्वांना इंटरनेटसाठी उपयोग होईल. मला पण ही कल्पना आवडली आणि आम्ही हा वायफाय बसवून घेतला. खरंच, हा वायफाय म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाचा ऑक्सिजन आहे. त्याच्यामुळेच आपली अर्धी कामं बसल्याजागी होतात. आज आपण जाणून घेऊ की हे वाय फाय म्हणजे नेमकी काय भानगड आहे.

वाय-फाय म्हणजे काय ? | Wifi information in marathi

1 जानेवारी 1983 हा दिवस इंटरनेटचा ऑफिशिअल जन्मदिवस म्हणून गृहीत धरला जातो. परंतु त्यावेळी ही प्रणाली बरीच गुंतागुंतीची होती. याचा वापर प्रत्येक जण करू शकत नव्हता. कारण इंटरनेटच्या वापरासाठी खूप साऱ्या केबल्सची आवश्यकता असायची. परंतु जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेले तसतसं कम्प्युटर वायर केबलच्या जागी वायरलेस नेटवर्क आले. ज्याला आपण वाय-फाय असे म्हणतो. आज याचा वापर आपण प्रत्येक जागी करतो. संगणक, टॅब्लेट, स्मार्टफोन आणि इतर उपकरणांना इंटरनेटशी जोडण्यासाठी वापरलेले हे वायरलेस तंत्रज्ञान आहे.

“वायरलेस फिडेलिटी” यालाच आपण वायफाय असे म्हणतो. हे तंत्रज्ञान वापरुन आपण दोन किंवा अधिक उपकरणांमध्ये असणाऱ्या माहितीची देवाणघेवाण करू शकतो. वायफायचा शोध जॉन ओ’ सुलिवान आणि जॉन डीन यांनी 1991 मध्ये लावला. पण खरी गोष्ट अशी आहे की ते CSIRO (कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन) कंपनीत काम करायचे आणि त्याच्या संपूर्ण टीमने 1992 ते 1996 या काळात वायफाय नेटवर्कचा शोध लावला. पण जॉन ओ’ सुलिवान यांनी वाय-फायमध्ये काही बदल केले. वेग आणखी वाढविला आणि वायफाय सिग्नलला अधिक चांगले बनविले. म्हणूनच जॉन ओ’ सुलिवान यांना वायफाय शोधण्याचे श्रेय दिले जाते.

वाय-फाय एक प्रकारचे वायरलेस तंत्रज्ञान आहे. याला सामान्यत: वायरलेस लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क म्हणतात. वायफाय तंत्रज्ञान स्थानिक नेटवर्क क्षेत्रात वायरिंग शिवाय ऑपरेट करणे शक्य होते.लॅपटॉप, मोबाइल, संगणकीय उपकरणांसाठी वाय-फाय विकसित केले गेले होते, परंतु आता त्याचा मोठ्या प्रमाणात मोबाइल अॅप्लिकेशन्स, टेलिव्हिजन, डीव्हीडी प्लेयर आणि डिजिटल कॅमेरा यासारख्या उपकरणांमध्ये वापर होताना दिसत आहे.

वायफाय चालू केल्यानंतर एकदा का तो वायरलेस राउटर सोबत कनेक्ट झाला, की आपण इंटरनेट वापरू शकतो. पण राऊटरला इंटरनेटशी कनेक्ट राहण्यासाठी डीएसएल मोडेम वापरावा लागतो. तो वापरला नाही तर आपण इंटरनेट येऊ शकत नाही.

वायरलेस नेटवर्कमध्ये रेडिओ सिग्नल, अँटेना आणि राउटर अशा तीन घटकांचा समावेश असतो. वाय-फाय नेटवर्किंग रेडिओ लहरींमुळे शक्य झाले आहे. संगणकात वायफायचा वापर करावयाचा झाल्यास त्यामध्ये “वायरलेस अडॉप्टरचा” समावेश असावा जो रेडिओ सिग्नलमध्ये पाठविलेल्या डेटाचे भाषांतर करेल. हेच रेडिओ सिग्नल एंटेनाद्वारे राउटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डीकोडरवर प्रसारित केले जातात. हे सिग्नल्स डीकोड झाल्यावर, वायर्ड इंटरनेट कनेक्शनवद्वारे हा डेटा इंटरनेटवर पाठविला जातो. सध्या नवीन लॅपटॉप, मोबाईल फोनमध्ये इनबिल्ट वाय-फाय कार्ड किंवा चीप असतात ज्यामुळे आपण काहीही न करता या उपकरणांमध्ये वायफायचा वापर करू शकतो. हे नेटवर्क कनेक्शन फ्री (Wireless) असल्याने वापरकर्त्यास लॉग इन आयडी आणि पासवर्ड विचारला जातो.

वायरलेस नेटवर्क सर्वात सामान्यपणे दोन फ्रिक्वेन्सीसह प्रसारित करतात “2.4 GHz आणि 5 GHz”. नेटवर्क गतीचे वर्णन करण्यासाठी मेगाबिट प्रति सेकंद किंवा गीगाबिट प्रति सेकंद वापरते. तुम्हाला सर्वांना Mbps आणि Gbps हे शॉर्ट फॉर्म माहीत असतील.

निवडणुकीच्या प्रचारामध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी वायफाय कनेक्शन बसवून देण्यात येईल असेही खूप ठिकाणी मुद्दे होते. वायफाय सेवा सध्या मोठ-मोठ्या शहरांमध्ये हॉट स्पॉट्सचे नव-नवीन पॉईंट तयार करत आहेत. हा एक छोटासा बॉक्स आहे जो इंटरनेटमध्ये हार्डवेअरयुक्त असतो. रेस्टॉरंट्स, विमानतळ आणि हॉटेल कार्यालये, विद्यापीठे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी बरेच वायफाय हॉट स्पॉट्स उपलब्ध आहेत.

भारतात वायफायची आवश्यकता मोठंमोठ्या कंपन्यानाच नाही तर छोटेमोठी दुकाने, वर्क फ्रॉम होम करत असलेली मंडळी, कोविड काळात शाळा महाविद्यालयांचे वर्ग घेणारे या सर्वांना असते. विद्यार्थ्यांसाठी वायफाय हे वरदान ठरले आहे. कारण इंटरनेट वरून सर्व प्रकारचं शिक्षण घेता येतं. भारतामध्ये पुष्कळ शहरात वायफाय झोन बनवलेले आहेत जिथं मोफत वायफाय सुविधा मिळते. तसेच रेल्वे, मॉल, काही कॉफी शॉपच्या ठिकाणी पण वायफाय सुविधा दिली जाते. इंटरनेटमुळे सारे जग जवळ आलेले आहे. आपण श्वास घेतो त्याच प्रकारचा आजचा आपला दुसरा श्वास किंवा गरज म्हणजे हा वायफाय होय.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button