डोक्यात घातलेल्या कॅपवर, हे बटन का लावले जाते | Why is there a button on top of my hat?

जर कुठे भटकंती करायला जायचं असल्यास किंवा खेळायला जायचे असल्यास बहुतेक लोक डोक्यावर कॅप आठवणीने घालतात. तसेच उन्हाळ्यात लागणाऱ्या उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण टोपीही घालतात. या सर्वांमध्ये विशेष खेळाडू टोपी घालतात. विशेष म्हणजे आता कॅप घालने ही एक आयकॉनिक स्टाईल देखील बनली आहे. ज्यामुळे बहुतांश लोक तिचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही देखील कधीही ना कधी कॅप घातलीच असेल.

डोक्यात घातलेल्या कॅपवर हे बटन का लावले जाते, तसेच या बटनाला काय म्हणतात? | Why is there a button on top of my hat?

तेव्हा तुम्ही कधी कॅपच्या किंवा टोपीच्या डिझाईन ला नीट पाहिले आहे का? तुम्ही डोक्यात घातलेल्या कॅपच्या वरच्या बाजूला एक बटन लावलेला असतो. पण हे बटन कशासाठी लावले जाते या गोष्टींचा आपण कधी विचार केला आहे का? तर चला मग डोक्यात घातलेल्या टोपीवरील बटणामागचे कारण जाणून घेऊयात.

तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार डोक्यात घातलेल्या बटण असलेल्या कॅपला बेसबॉल कॅप म्हणतात. विशेष म्हणजे तुम्ही हे पाहिलेले असेल की नुसते बेसबॉल खेळाडूच नाहीतर क्रिकेट किंवा इतर खेळ खेळणारे खेळाडू देखील असाच टोप्या डोक्यात घालतात.

आतापर्यंत आपण जी माहिती जाणुन घेतली ती होती कॅप बद्दलची, आता जाणुन घेऊयात या कॅपवरील बटणाला काय म्हणतात याविषयी

डोक्यात घातलेल्या कॅपच्या वरच्या बटनाला स्कवॅची किंवा स्कवाचो म्हणतात. तुम्ही विचार करत असाल की हे असे विचित्र नावं का? वास्तव मध्ये हे नाव बेसबॉल खेळाडू आणि समलोचक बॉब ब्रेनली त्यांनी बेसबॉल कॅपच्या वरच्या बटनाला हे विचित्र नाव दिले होते. त्याने हे नाव 1980 च्या दशकात त्याच्या सॅन फ्रान्सिसको संघातील माईक क्रुको यांच्याकडून ऐकले होते.

आता आपण जाणून घेऊयात हे बटन टोपीवर का असते?

टोपीचा वरचा भाग वेगवेगळ्या फॅब्रिक्स एकत्र करून बनविला जातो. जेथे सर्व तुकडे टोपीच्या वरच्या बाजूला जमा केले जातात. तेथे एक तर छिद्र किंवा विचित्र संयुक्त आहे. जे पाहताना खूपच वाईट दिसते आणि विशेष म्हणजे ते कॅपची डिझाईन देखील खराब करते. त्यामुळे ते झाकण्यासाठी आणि टोपीला सुंदर बनवण्यासाठी हे उपयोग गोलाकार बटनासारखे लावले जाते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button