पायी चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे.पण बरेचं लोक या चालण्याला व्यायाम मानत नाहीत. चालणं ही एक शारीरिक क्रिया आहे. आणि याचे खूप फायदे आहेत. हे स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत करते आणि चयापचय क्रिया वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, नियमितपणे अर्धा तास चालणे आवश्यक आहे. तर मग जाणून घेऊया काय आहेत फायदे.
दररोज अर्धा तास पायी चालल्याने दूर होतील या समस्या |
ब्लड शुगर नियंत्रणात राहते
आपल्याला डॉक्टर नेहमी सल्ला देतात की जेवण झाल्यावर झोपू नये. त्याऐवजी काही वेळ चाललं पाहिजे. जेवण झाल्यानंतर पायी चालण्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. हा एक चांगला व्यायाम आहे. जो की आपण करत नाही.
जॉइंट्स आणि मसल्स मजबूत होतात
नियमित चालण्यामुळे शरीराच्या खालच्या भागातील स्नायूं मजबुत होतात. त्याचबरोबर गुडघे आणि कमरेचे स्नायू सुद्धा बळकट होतात. सपाट पृष्ठभागावर चालण्याऐवजी, किंचित उंच भागात चालणं फायदेशीर ठरेल.
कॅलरी बर्न होतात
फक्तं हेवी वर्कआउट्स किंवा व्यायाम करून कॅलरी बर्न करू शकता असं नाही. तुम्ही चालण्याद्वारेही वजन कमी करू शकता. वजन किती कमी करायचं आहे आणि तुम्ही किती वेगाने तसचं किती दिवस चालणार आहात यावर अवलंबून आहे.
एनर्जी बूस्ट होते
दिवसभर घरी बसून स्टॅमिना कमकुवत होतो. मात्र तुम्ही याची काळजी करू नका कारण काही काळ पायी चालण्याने तुम्ही उर्जेला चालना देऊ शकता. चालण्यामुळे, शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे नॉरेपाइनफ्रिन आणि एपिनेफ्रिन यांसारख्या हार्मोन्सची पातळी सुद्धा वाढते.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.