मित्रांनो आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. पण जर आपला चालू फोन खराब झाला तर, लगेच आपण नवीन फोन घेण्याचा विचार करतो. पण काही युजर्स असे असतात जे की सेकंड हॅन्ड मोबाईल खरेदी करण्याचा विचार करतात.
सेकंड हँड स्मार्टफोन घेताय मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी | What to check when buying second hand mobile
जर तुम्ही देखील काही कारणास्तव सेकंड हँड फोन खरेदी करत असाल तर तुमच्याकडून काही चुका होऊ शकतात. कारण कधी कधी थोडासा निष्काळजीपणा देखील मोठा त्रास देऊ शकतो. म्हणूनच अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या टिप्स.
रिफर्बिश्ड केलेला फोन किंवा वापरलेला फोन?
सर्वप्रथम, रिफर्बिश्ड केलेले फोन हे निर्मात्याद्वारे विकले जातात.या दोन्हीमधला फरक जाणून घेऊया. रिफर्बिश्ड फोन हा मर्यादित कालावधीच्या वॉरंटीसह विकला जातो. जेव्हा तुम्ही वापरलेला फोन (Second hand phone) विकत घेता तेव्हा तो थर्डपार्टी कडून विकला जातो. या प्रकरणात, या फोनसाठी कोणतीही वॉरंटी दिली जात नाही.
तुम्ही फोन कोणत्या सोर्सने खरेदी करत आहात?
जर तुम्ही सेकंड हँड फोन घेणार असाल तर लगेच ऑनलाइन वेबसाइटवर जाणे योग्य नाही. हे खूप महत्वाचे आहे की आपण प्रथम ओळखीच्या व्यक्तीशी व्यवहार करा, नहीतर फक्त विश्वसनीय साइटला भेट द्या. सेकंड हँड उपकरणांसाठी, तुम्ही Olx, Ebay, Cashify सारख्या website ला भेट देऊ शकता. येथे युजर्सच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते.
प्रत्येक डिव्हाइस नीट तपासून पाहा?
जर तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असाल तर फोनचे फोटो नीट तपासा. काही वेळा फोनचे काही डॅमेज पार्ट दिसत नाहीत, किंमत मोजल्यानंतर हे नुकसान उघड होते. अशा परिस्थितीत तुम्ही ज्या खरेदीदाराकडून फोन विकत घेत आहात त्यांच्याकडून फोनच्या प्रत्येक अँगलचे फोटो मागवा आणि जर शक्य झाल्यास तर प्रत्यक्षात फोन चेक करा.
हे सुध्दा वाचा:- स्मार्टफोनमधील सिस्टम अपडेट करताना चुकूनही ‘या’ चुका करू नका
योग्य किंमतीत फोन खरेदी करा?
फोनच्या अचूक किमतीबद्दल युजर्सला माहीत नसल्यामुळे डिलनंतर त्यांना फसवणुकीचा सामना करावा लागतो. जर तुम्ही सेकंड हॅन्ड मोबाईल विकत घेत असाल तर त्याच्या किमती बद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
नंतर फोनची स्थिती आणि वापरलेल्या वेळेच्या आधारावर फोनची ठरवा. आणि फोन खरेदी केल्याचा पुरावा तुमच्याकडे घेऊन ठेवा. मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठीच माहितीपूर्ण ठरेल.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.