पारपत्र आणि व्हिसा म्हणजे काय? | What is the different passports and visas in marathi

परदेशात जाणं हे अनेकांचं स्वप्न असतं मग ते उच्च शिक्षणासाठी असो की फिरण्यासाठी. यासाठी त्यांची मानसिक तयारी तर झालेली असते पण काही तांत्रिक बाबीसुद्धा यासाठी पूर्ण कराव्या लागतात. यात पारपत्र आणि व्हिसा या महत्वाच्या बाबी आहे. अनेकांना ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं वाटतं पण पारपत्र (passports) आणि व्हिसा (visas) या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्याकडे पारपत्र नसेल तर तुम्ही व्हिसासाठी अर्ज करण्याचा प्रश्नच नाही. व्हिसा मिळवण्यासाठी पारपत्र आवश्यक आहेच. पण तुमच्याकडे पारपत्र असेल तर तुम्हाला व्हिसा मिळतोच असं नाही. या दोन्ही संकल्पना आपण सविस्तर समजून घेणार आहोत.

पारपत्र आणि व्हिसा म्हणजे काय? | What is the different passports and visas in marathi

पारपत्र (पासपोर्ट) हा अधिकृत सरकारी दस्तऐवज आहे ज्यात त्याच्या धारकाची ओळख असते. देशाच्या नागरिकास परदेशात त्याच्या (पारपत्राच्या) संरक्षणाखाली प्रवास करण्यास मदत करते. हा दस्तऐवज त्याच्या धारकाची वैयक्तिक ओळख आणि राष्ट्रीयत्व प्रमाणित करतो.

‘व्हिसा’ ही अधिकृत परवानगी असते जी एखाद्या विशिष्ट देशाला दुसऱ्या देशाच्या पारपत्र धारकाला भेटीपूर्वी मंजूर करणे आवश्यक असते. व्हिसा म्हणजे पारपत्र धारकाला ज्या देशाचं त्याने पारपत्र धारण केले आहे त्या व्यतिरिक्त दुसऱ्या देशात जाण्याची तात्पुरती परवानगी दिली जाते.

भारतात तीन प्रकारचे पारपत्र आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कोणते पारपत्र धारण करता यावर तुम्हाला व्हिसा मिळण्याची शक्यता अवलंबून असते.

  1. सामान्य पारपत्र: एक सामान्य पासपोर्ट नेव्ही ब्लू (गडद निळ्या) रंगाचा असतो आणि सामान्य प्रवासी किंवा व्यावसायिकाला हे प्रदान केले जाते.
  2. डिप्लोमॅट पारपत्र: डिप्लोमॅट पासपोर्टचे मुखपृष्ठ मरून रंगाचे असते. हे फक्त भारतीय डिप्लोमॅट, डिप्लोमॅट कुरियर किंवा उच्च सरकारी अधिकाऱ्यांनाच दिले जाते.
  3. अधिकृत पारपत्र: नेव्ही ब्लू आणि मरून पासपोर्ट व्यतिरिक्त, भारत सरकार अधिकृत पारपत्र देखील प्रदान करते. भारत सरकारचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना पांढऱ्या रंगाचे हे पारपत्र प्रदान केले जाते.

जगात असेही अनेक देश आहेत जिथे भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नसते. तुमच्याकडे पारपत्र असेल तर त्याच्या साहाय्याने भारतीयांना या देशात पोहचल्यावर व्हिसा मिळवता येतो. अथवा काही काळ विना व्हिसा वास्तव्य करता येते. या देशांच्या यादीत आफ्रिकन, अमेरिकन आणि आशियाई देशांचा समावेश आहे.

बॉलिव्हिया, गुयाना, हैति, ग्रीनडा, जमाईका हे काही अमेरिकन देश आहेत. आफ्रिकन देशांत युगांडा, केनिया, टांझानिया, केप वर्डे, टोगो, इथिओपिया यासारख्या देशांमध्ये व्हिसा घेऊन जाण्याची आवश्यकता नसते. तर थायलंड, मकाऊ, जॉर्डन, मालदीव, इराक, लाओस, कंबोडिया, बहरिन, भूतान ह्या आशियाई देशात भारतीय विना व्हिसा अथवा काही काळ व्हिसाशिवाय काही काळ वास्तव्य करू शकतात. नेपाळ या भारताच्या शेजारी देशात भारतीयांना जायचं असेल तर पारपत्र देखील आवश्यक नाही.

करोनाच्या अगमनापूर्वी भारतीयांना संयुक्त अरब अमिरात या देशात गेल्यावर व्हिसा मिळवायची सोय उपलब्ध होती. पण करोनाने मात्र या देशाची भारतीयांकडे पाहण्याची नजर बदलली असंच म्हणावं लागेल. कारण आता या देशात जायचं असेल तर आधी व्हिसा मिळवणे बंधनकारक केलं आहे. यामुळे यंदा दुबईमध्ये होणाऱ्या ‘एक्स्पो २०२०’ भारतीयांना यचं असेल तर दुबई सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. दुबईच्या एमिरात या हवाई वाहतूक कंपनीने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. ही व्हिसा परवानगी नाकारण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी जर तुम्ही संयुक्त राष्ट्राचे, युरोपियन महासंघाचे किंवा इंग्लंडचे व्हिसा धारक असाल तर मात्र दुबईत तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. यात तुमच्या पारपत्राची अंतिम तारीख ६ महिन्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. आता भारतीयांना दुबईत ‘ऑन अरायव्हल व्हिसा’ कधी मिळणार? याची प्रतीक्षा असेल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button