बऱ्याच वेळा आपण पाहिले असेल की बिझनेस न्यूज चॅनल वर बरेच ॲनालिस्ट चार्ट पाहून सांगतात की एखाद्या स्टॉकची किंमत वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. हे सर्व अनुमान लावले जाते ते टेक्निकल ऍनालिसिस मुळे.
टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे? | What is technical analysis in marathi
जर टेक्निकल चार्ट वर एखादा पॅटर्न भूतकाळ तयार झाला असेल आणि तिथून मार्केट वर किंवा खाली गेले असेल आणि वर्तमान काळात जर सेम पॅटर्न चार्ट वर आपल्याला दिसला तर तिथून सुद्धा मार्केट वर किंवा खाली जाण्याची शक्यता असते कारण बरेच लोक चार्ट वर असे पॅटर्न पाहून खरेदी किंवा विक्री करत असतात.
त्यामुळे जर बुलिश पॅटर्न तयार झाला तर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते आणि मार्केट येथून वर जाते याउलट चार्ट वर जर बेयरिश पॅटर्न तयार झाला तर विक्री करणाऱ्यांची संख्या वाढते आणि मार्केट तेथून वर जाते.
तर टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे, टेक्निकल चार्ट वर भूतकाळात तयार झालेले असे पॅटर्न शोधणे जेथून मार्केट वर किंवा खाली गेले आहे आणि तेच पॅटर्न जर वर्तमान काळात दिसले तर मार्केट खाली किंवा वर जाणार याचा अंदाज लावणे. ज्याप्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हटले जाते त्याच प्रमाणे भुतकाळात तयार झालेले चार्ट पॅटर्न वर्तमान काळात सुद्धा दिसून येतात आणि त्याप्रमाणे खरेदी किंवा विक्री केली जाते.
टेक्निकल ऍनालिसिस कसे केले जाते? टेक्निकल ऍनालिसिस साठी आपल्याकडे चार्टिंग प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे. आजकाल सर्व ब्रोकर्स आपल्या ग्राहकांना चार्टिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात याचा वापर करून आपण टेक्निकल ऍनालिसिस करू शकता. चार्ट चे बरेच प्रकार आहेत जसे की कॅन्डल स्टिक चार्ट, लाईन चार्ट, हेईकन अशी, रेनको चार्ट इत्यादी.
टेक्निकल ऍनालिसिस मध्ये प्रामुख्याने कॅन्डल स्टिक चार्ट वापरला जातो. कारण त्यावरून प्राईज वाढणार किंवा कमी होणार याचे अनुमान लावणे सोपे जाते. याव्यतिरिक्त हेईकन अशी चार्ट सुद्धा लोकप्रिय आहे.
टेक्निकल चार्ट चा अभ्यास करताना प्रमुख्याने दोन प्रकारचे पॅटर्न पाहिले जातात.
- कॅन्डल स्टिक पॅटर्न
- चार्ट पॅटर्न
कॅन्डल स्टिक पॅटर्नमध्ये दोन किंवा अधिक कॅण्डल एकत्र येऊन एक प्रकारचे स्ट्रक्चर तयार होते. हे स्ट्रक्चर बुलिश किंवा बेयरिश असू शकते. जर बुलिश स्ट्रक्चर तयार झाले तर मार्केट वर जाते आणि बेयरिश स्ट्रक्चर तयार झाले तर मार्केट खाली येते. कॅन्डल स्टिक पॅटर्नची काही उदाहरणे खालील प्रमाणे. बुलिश / बेयरिश एंगलफिंग, हॅमर, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, पिन बार, हरामी इत्यादी.
चार्ट पॅटर्नमध्ये बऱ्याच कॅन्डल्स एकत्र येऊन एक स्ट्रक्चर तयार होते. हे स्ट्रक्चर बुलिश किंवा बेयरिश असू शकते त्यानुसार मार्केट वर किंवा खाली जाते. चार्ट पॅटर्न ची काही उदाहरणे खालील प्रमाणे. फ्लॅग पॅटर्न, हेड अँड शोल्डर पॅटर्न, ट्रॅगल पॅटर्न, कप आणि हॅन्डल पॅटर्न, राऊंडिंग बॉटम पॅटर्न, डबल टॉप, डबल बॉटम इत्यादी.
टेक्निकल ऍनालिसिस मध्ये बऱ्याच प्रकारचे इंडिकेटर सुद्धा वापरले जातात त्यावरून मार्केट वर जाणार का खाली जाणार याचा अंदाज बांधला जातो. काही लोकप्रिय इंडिकेटर खालील प्रमाणे. मुविंग ऍव्हरेज, RSI, CCI, सुपर ट्रेंड इत्यादी.
थोडक्यात सांगायचे झाले तर, टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे भुतकाळात चार्ट वर तयार झालेले पॅटर्न जर वर्तमान काळात सुद्धा तयार झाले तर त्या पॅटर्न वरून मार्केट वर किंवा खाली जाणार याचा अंदाज बांधणे. टेक्निकल ऍनालिसिस हे फक्त टेक्निकल चार्ट पाहून केले जाते त्यामध्ये कंपनीचे फंडामेंटल बघितले जात नाही. टेक्निकल ऍनालिस्ट चा वापर करून आपण इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग आणि लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट देखील करू शकता.
Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Dnyan_shala आणि Shares_dnyan या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.