OTP म्हणजे काय? सविस्तर पणे जाणून घेऊया | What is OTP in Marathi

बँकेच्या व्यवहारापासून ते व्हाट्सॲप, शॉपिंग वेबसाईट वगैरेपर्यंत ओटीपीची सुरक्षा सर्वत्र असते. सांकेतिक अक्षरे (पासवर्ड) या सर्व ॲप किंवा वेबसाईटवर असतोच पण सुरक्षेची दुसरी पायरी म्हणून ओटीपी (OTP) देखील आवश्यक असतो. ओटीपी म्हणजे ‘वन टाईम पासवर्ड’ अर्थात ‘एक वेळचे सांकेतिक अक्षरे’. पासवर्डच्या तुलनेत ओटीपी अधिक सरस ठरतो. यात पासवर्ड लक्षात न राहणे, इतरांना कळणे वगैरे बाबी येऊच शकत नाहीत. कारण हा कोड एकदाच वापरता येतो.

OTP म्हणजे काय? सविस्तर पणे जाणून घेऊया | What is OTP in Marathi

ओटीपी-आधारित प्रमाणिकरण पद्धतींमध्ये वापरकर्त्याचे ॲप आणि सर्व्हर योग्य आणि अचूक ओटीपीच्या प्रमाणिकरणावर अवलंबून असतात. चुकीचा ओटीपी टाकल्यास पुढचे व्यवहार होतच नाहीत. हॅश मेसेज ऑथेंटिकेशन कोड (एचएमएसी) अल्गोरिदम आणि वेळ – आधारित माहिती (टीओटीपी) किंवा इव्हेंट काउंटर (एचओटीपी) वापरून ओटीपी तयार केले जातात. ओटीपी हे काही क्रमांक किंवा काही अक्षरे अशा स्वरूपात असतात.

ओटीपी हा काही ठराविक कालावधी पुरता वैध असतो. संबंधित वैधता त्या त्या ओटीपी संदेशाच्या खाली दिलेली असते. किमान 30 सेकंदापासून ते दोन दिवसांपर्यंत या ओटीपीची कालमर्यादा असू शकते. ही मर्यादा त्या त्या ओटीपीच्या महत्वावर अवलंबून असते. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना हे वेळेचे बंधन अधिक कमी म्हणजे काही मिनिटांपर्यंतच असते. त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही व्यवहार करताना तरी कालमर्यादा अधिक असू शकते. जसे की तुम्ही तुमच्या वापरात असलेल्या नेटवर्क (एअरटेल, जिओ वा व्होडाफोन) मधून बाहेर पडून इतर नेटवर्क कंपनीत जाऊ इच्छित असाल तर तिथे ओटीपी द्यावा लागतो ज्याची मर्यादा 48 तास असू शकते.

ओटीपी मिळवण्यासाठी भारतात सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम म्हणजे Short message Service SMS अर्थात ‘छोटा संदेश सुविधा’. याव्यतिरिक्त देखील ओटीपी वेगवेगळ्या मार्गाने पाठवता येतो. ज्यात आपल्या इमेल, संबंधित ॲपच्या सर्व्हरचा समावेश होतो. भारतात एसएमएस ही पद्धत वापरली जात असली तरी अमेरिकेत मात्र यावर अनेक बंधने आहेत. गुणवत्ता आणि तंत्रज्ञान राष्ट्रीय संस्थेने दुहेरी सुरक्षा पद्धत (टू स्टेप ऑथेंटिकेशन फॅक्टर) आणि ओटीपीसाठी एसएमएसचा वापर वगळण्याची योजना जाहीर केली आहे. कारण ही पद्धत देखील फसवणुकीस कारणीभूत ठरू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अमेरिकेतील अनेक व्यावसायिक ओटीपीसाठी एसएमएस ऐवजी इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करतात.

ओटीपीची आपली अशी काही ठळक वैशिष्ट्यं आहेत. सांकेतिक शब्द अनेकदा आपण विसरतो किंवा एखाद्या वेळेस हे हॅक केले जातात. अशावेळी सुरक्षेच्या कारणास्तव ते पुन्हा निर्माण करावे लागतात. अन्यथा गैरप्रकार घडण्याची शक्यता अधिक असते. ओटीपीत मात्र ही समस्या नसते. प्रत्येकवेळी हा ओटीपी बदलत जातो. मागे वापरलेला ओटीपी पुन्हा वापरता येत नाही. याव्यतिरिक्त अजून एक खास बाब म्हणजे ओटीपीची कालमर्यादा. ठरलेल्या वेळात आपण ओटीपीचा वापर केला नाही तर तो अवैध ठरतो. मग पुन्हा नव्याने ओटीपी तुम्हाला मागवावा लागतो.

काळ बदलला तशी माणसांची नियतही बदलत गेली. आज संपूर्णपणे तांत्रिक झालेल्या व्यवहारात आपली फसवणूक होईल का अशी भीती आपल्याला सातत्याने लागून असते. ओटीपी ही एक यंत्रणा आणि जी तुम्हाला या बाबतीत आश्वस्त करते. फक्त तुम्ही आपल्या कोणत्याही व्यवहाराच्या वेळी आलेला ओटीपी कोणालाही अनोळखी, अविश्वासपात्र व्यक्तीस देऊ नका. ओटीपीचा क्रमांक तुमच्या व्यवहारांची चावी आहे. म्हणूनच ती जपून वापरली पाहिजे. आपले सर्व ऑनलाईन व्यवहार बिनधास्त करा कारण ओटीपी आहे आपल्या साथीला.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button