कशी येते परिपक्वता? (मॅच्युरिटी) | What is maturity in Marathi

माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता (मॅच्युरिटी) येते. माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते. माणूस त्याच्या समोरचे लोक जसे तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते. 

प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे परिपक्वता येते. प्रत्येक वेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते.माणूस काळानुसार बदल स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते. 

माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते. माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते. 

माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतः मध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते. माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते.माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते. 

माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे परिपक्वता येते. परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे !

Note:- मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वर @Dnyan_shala या पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ