मधुमेह म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि कारणे | What is Diabetes in Marathi

मधुमेह म्हणजे असा विकार ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजचे (साखरेचे) प्रमाण वाढते. इन्शुलिन नामक हार्मोन्सच्या कमतरतेमुळे हा विकार आढळतो.ग्लुकोज हा शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. ग्लुकोजमुळे शरीराला ऊर्जा मिळते. शरीरास कार्य करण्यास या ऊर्जेची मदत होते. स्वादूपिंडामधून (Pancreas) स्त्रवणाऱ्या इन्शुलिनद्वारे शरीरातील लाखो पेशींपर्यंत ग्लुकोज पोहचवले जाते.

जेव्हा इन्शुलिनच्या निर्मितीत बिघाड होतो तेव्हा ग्लुकोज/साखर पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही व त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इन्शुलिनचे कार्य हे वॉचमनसारखे आहे, जे रक्तातील साखरेस पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत करते.

कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे | What is Diabetes Symptoms

  • वारंवार लघवीला जाणे.
  • वारंवार तहान लागणे.
  • लवकर थकवा येणे.
  • जखम भरण्यास वेळ लागणे.
  • तीव्र भूक लागणे व वजनात घट होणे.

मधुमेहाची कारणे कोणती आहे? | Effects of Diabetes

आनुवंशिकता

जर जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असेल तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते. जर आई-वडील दोघांनाही मधुमेह असेल तर मधुमेह होण्याची तीव्र शक्यता असते.

लठ्ठपणा

जर माणसाचे वजन सामान्य वजनापेक्षा 20% जास्त असेल तर मधुमेहाची शक्यता जास्त असते. सुटलेल्या पोटामुळे स्वादूपिंडावर ताण पडतो आणि इन्शुलिन निर्मितीत अडथळा निर्माण होतो.

गरोदरपणा

गरोदरपणात जर बाळाचे वजन जास्त असेल अथवा आईचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त वाढले असेल तर तात्पुरता मधुमेह होण्याची शक्यता असते. प्रसुतीनंतर खूपदा हा मधुमेह नाहीसा होतो. परंतु अशा महिलांमध्ये भविष्यकाळात मधुमेह होण्याची दाट शक्यता असते.

औषधे

अनेक औषधांमुळे इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. जसे उच्च रक्तदाबातील औषधे, गर्भनिरोधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन्स, मनावर परिणाम करणारी औषधे. ही काही औषधे इन्शुलिनच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतात.

तणाव आणि जीवनशैली

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तणाव वाढला आहे. तणावामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात. त्यामध्ये मधुमेहदेखील एक आहे. जीवनशैली अथवा आजची लाईफ स्टाईल मधुमेहास आमंत्रण देते. व्यायामाची कमतरता, जास्त बैठे काम, क्रोध, कामाचा तणाव, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी, जंक फूड, अति गोड पदार्थ इ. मधुमेहास कारणीभूत ठरतात.

हे सुध्दा वाचा- तणाव कमी करण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स!

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button