नमस्कार मित्रांनो आज आपण बिटकॉइन(Bitcoin) बद्दल जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना बिटकॉइन बद्दल माहित नाही त्यामुळे आज आपण सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. बिटकॉइन ही एक प्रकारची क्रिप्टोकरेंसी आहे. जुलै 2020 मध्येही बिटकॉईन चर्चेत आलं. तेव्हा बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क या सारखे मोठे उद्योगपतीचे ट्विटर अकाऊंट्स एका सायबर हल्ल्याद्वारे हॅक करण्यात आले होते. या हल्ल्याला बिटकॉईन स्कॅम म्हटलं गेलं होतं. याचबरोबर बराक ओबामा, जो बायडन, कान्ये वेस्ट यांच्या ऑफिशल अकाऊंट्सकडेही क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी मागण्यात आली होती.सर्वांत पहिले क्रिप्टोकरन्सी काय आहे? ते जाणून घेऊया मग बिटकॉइन बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? | What is Cryptocurrency in marathi

क्रिप्टोकरन्सी बद्दल सांगायचं जर झालं अगदी तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. म्हणजेच चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल व्हर्च्युअल करन्सी.म्हणजे हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर किंवा ब्रिटीश पौंड सारखं नसतं. कोणत्याही देशाचं सरकार किंवा बँक हे चलन छापत नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते.
मायनिंग द्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात.जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलनं आहेत, तसेच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी आहेत.बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करणार आहे.
बिटकॉइन म्हणजे काय ? | What is Bitcoin in marathi
बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे.बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.
जस की आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पैशातून खरेदी करता येतं.
ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू ठेवू शकता.अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग असे म्हणतात.
जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतात, तितके अधिक ब्लॉक बनतात आणि तितके माईनिंग तयार होतात. आपल्याला प्रश्न पडला असेल की, ब्लॉकचेन हा काय प्रकार आहे. चला तर मग याबद्दल थोडक्यात जाणून घेऊन या.
ब्लॉकचेन म्हणजे काय ? | What is Blockchain in marathi

क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरलं जातं.ब्लॉकचेन म्हणजे रेकॉर्ड्सची लिस्ट. ज्यामध्ये विविध स्वरूपाची माहिती मोठ्या प्रमाणात साठवली जाते म्हणजेच रियल टाईममध्ये साठवली जाते.आणि प्रत्येक साखळीचा आपल्या आधीच्या साखळीतल्या माहितीशी संबंध असतो. ही माहिती एकदा रेकॉर्ड झाल्यानंतर बदलता येत नाही.
ही माहिती एका लोक ब्लॉक मध्ये ठेवून अशे अनेक ब्लॉक एकात एक ठेवण्यासारखं हे असतं. त्यामुळे त्याच्यासोबत छेडछाड करता येणं खूपचं कठीण आहे. त्यामुळे व्यवहार अतिशय सुरक्षित होतात आणि ही यंत्रणा हॅक होण्याची शक्यता कमी असते.
ऑनलाईन व्यवहारांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान सगळ्यात सुरक्षित मानलं जाते. शिवाय त्यामध्ये गुप्तता आहे. आणि व्यवहार फक्त दोन व्यक्ती किंवा कम्प्युटरद्वारे होते. त्यामुळे त्यावर इतर कुणाचं नियंत्रण नसतं. म्हणूनच ब्लॉकचेन व्यवहार डेमोक्रॅटिक किंवा मुक्त मानले जाते.
Note – जर तुम्हाला What is Bitcoin in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.