प्रत्येक भारतीयांचा आधार हे त्याचे ‘आधार कार्ड’ आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. रेल्वेच्या अरक्षणापासून ते सिम कार्डच्या खरेदीपर्यंत आज सर्वत्र आधार कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमानाने प्रवास करायचा झाल्यास आधार कार्ड विमानतळावरील आपलं प्रवेशपत्र ठरू शकते. देशातील 1.2 अब्ज नागरिक आधारने जोडली गेली आहेत. 99% प्रौढ नागरिक आधार कार्ड धारक आहेत.
आधारकार्ड म्हणजे काय ? | What is aadhar card in marathi
आधार कार्ड हे बारा अंकी अनियमित क्रमांक असलेले कार्ड असते. ज्यात प्रत्येक नागरिकाची जनसांख्यिक आणि जैवसांख्यिक माहिती असते. जनसांख्यिक माहितीमध्ये नागरिकाचे जात, धर्म, लिंग याविषयी माहिती घेतली जात नाही. फक्त आधार कार्डासाठी अर्ज करणाऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता आणि जन्मतारीख (संबंधित पुराव्याचे कागदपत्रे) ही माहिती घेतली जाते. जैवसांख्यिक माहितीमध्ये दोन्ही हातांचे दहा ठसे आणि डोळ्यांचे बबुळ स्कॅन केले जातात. आधार कार्ड हे फक्त भारतीय नागरिकांना दिले जाते. अनिवासी भारतीय असल्यास वर्षातून किमान 182 दिवस त्या व्यक्तीचे भारतात वास्तव्य असायला हवे. तरच त्याला आधार कार्ड मिळवता येते.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही नवीन आधार कार्डासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला फक्त आवश्यक कागदपत्रे घेऊन आधार केंद्रात जायचे आहे. यासाठी कोणतीही रक्कम फी म्हणून तुम्हाला भरावी लागणार नाही. आधार कार्डात बदल करायचे असल्यास दोन पर्याय उपलब्ध असतात. एकतर तुम्ही जवळच्या आधार केंद्रात जाऊ शकता किंवा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पोर्टल वरून संबंधित बदल स्वतः करू शकता. यासाठी फक्त 50 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. आता आधार कार्ड प्लास्टिक कार्डच्या (पीव्हीसी) स्वरूपात देखील तुम्ही मिळवू शकता.
केंद्र सरकारने 16 मार्च 2016 मध्ये आधार कायदा मंजूर करून घेतला. जुलैपासून याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे याचं कार्य पाहिलं जातं. अल्पावधीतच याचे महत्त्व अनेक क्षेत्रांत वाढू लागले. नागरिकांचे प्राथमिक ओळखपत्र म्हणून आधारकार्ड वापरण्यात येऊ लागले. आधारचा दुहेरी फायदा समोर येऊ लागला. आधार कार्ड ही देशातील नागरिकांची माहिती मिळवण्याची सर्वोत्तम आणि किफायतशीर पद्धत आहे. आधार कार्डामुळे सरकारचे 12 अब्ज डॉलर एवढ्या रकमेची बचत झाल्याचं युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एका माहितीपत्रकात सांगितले. दुसरीकडे नागरिकांना देखील हे सोयीचे ठरू लागले. आपल्या भारतीयत्वाचे प्रमाणपत्र आता पाकिटात ठेऊन कुठेही जाण्याची सोय यामुळे झाली.
राष्ट्रीय ओळख प्राधिकरण विधेयक, 2010: आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयांची ओळख म्हणून समोर यावी यासाठी 2009 साली तत्कालीन सरकारने ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आधार कार्ड नागरिकांना देण्यात देखील आले. त्याच वर्षात देशातील नागरिकाला एका बारा अंकी बायोमेट्रिक पडताळणी केलेलं कार्ड देणारा हा जगातील सर्वात मोठा उपक्रम म्हणून समोर आला. आज आपण ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (युआयडीएआय) म्हणून ज्याला ओळखतो ते 2009 साली तत्कालीन सरकारने ‘राष्ट्रीय ओळख प्राधिकरण विधेयक’ अंतर्गत लोकसभेत मांडले होते. विधेयक त्यावेळी मंजूर होऊ शकले नाही. विद्यमान सरकार त्यावेळी विरोधात होते. ‘सरकार लोकांची खाजगी माहिती आपल्याकडे मिळवू इच्छित आहे. नागरिकांच्या खाजगी माहितीवर हा डल्ला आहे. यासाठी त्याला मोठा विरोध झाला आणि अखेर हे विधेयक लोकसभेत मंजूर झालेच नाही.
असे जरी असले तरी आज आधारचे महत्व अनन्यसाधारण आहे. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही राहत असलात तरी तुमचे भारतीयत्व सिद्ध करण्यास ‘आधार कार्ड’च पुरेसे आहे.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.