चिडचिडेपणाचे काय दुष्परिणाम आहेत? थोडक्यात जाणून घेऊया….

धावपळीच्या आयुष्यात चिडचिडेपणा येणे स्वाभाविक आहे. काही व्यक्तींना अगदी शुल्लक कारणावरून राग येतो. घरात आल्यानंतर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काही घडत नसल्यास चिडचिड सुरू होते. पण ही चिडचिड त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी फारच हानिकारक असते. त्यामुळे अति राग येण्याची कारणे काय असू शकतात ते आपण आज जाणून घेणार आहोत.

चिडचिडेपणाचे काय दुष्परिणाम आहेत? What causes irritability in marathi

हार्मोन्समध्ये बदल

हार्मोन्समध्ये बदल होणारे बदल हे देखील व्यक्तीच्या आरोग्यासाठी फारच फरक दाखवणारे असतात. वाढत्या वयानुसार आणि शरीरातील कमतरतेमुळे खूप जणांना हार्मोन्समध्ये बदल घडतात. जर असे बदल होत असतील तर तुमच्या स्वभावात त्याबद्दल फरक जाणवू लागतो. जर तुम्हाला हा फरक जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या हार्मोन्सवरील योग्य औषधे नक्की घ्या. यामुळे तुमच्या मध्ये नक्की फरक पडेल.

कॅल्शियमची कमतरता

जर सतत चिडचिडेपणा होत असेल तर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही. खूप जणांचा चिडचिडेपणा हा शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतो. जर तुमच्या शरीरात अशी कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्हाला सांधेदुखी, कंबरदुखी असे काही त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी तपासून घ्या. तसेच शरीरातील कॅल्शिअम वाढण्यात वाढवण्याचा प्रयत्न करा.

टेस्टोस्टेरॉनची कमतरता

पुरुषांसाठी टेस्टोस्टेरॉनची कमतरता असणे हे शरीरासाठी फारच त्रासदायक ठरू शकते. पुरुषांमध्ये असलेल्या हा घटक त्यांच्या मुडवर परिणाम करतो. जर शरीरातून टेस्टोस्टेरॉनची कमतरता कमी झाली असेल तर पुरुष आणि स्त्रि या दोघांमध्ये असलेला सेक्सचा आनंद कमी झालेला दिसतो. जर हा आनंद मिळाला नाही तरी देखील नक्कीच दोघांमध्ये चिडचिडेपणा येऊ लागतो.

अपुरी झोप

हल्लीच्या काळात कामाचा ताण सगळ्यांसाठी इतका झाला आहे की खुप जणांच्या कामाच्या वेळा या बदलून गेल्या आहेत. स्मार्टफोनचा अति वापर, यामुळेही झोप पूर्ण होत नाही. अति प्रमाणात ताण घेतल्याने सुध्दा झोप पूर्ण होत नाही. सतत रोजच जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर काही कालावधीनंतर अपुरी झोप ही देखील तुमच्या चिडचिडेपणाचे कारण ठरू शकते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button