रोज गरम पाणी प्यायलाने शरीरात होतात ‘हे’ बदल! | What Are the Benefits of Drinking Hot Water?

पावसाळा सुरू झाला, की गढूळ पाणी येतं म्हणून आपण सगळे पाणी उकळून पितो आणि थंडीत साधं नळाला येणारं पाणी देखील अधिक गार असतं. ते प्यायल्यामुळे लगेचच सर्दी कफ होण्याची शक्यता असते, म्हणून आपण गरम पाणी पितो. पण जर रोज गरम पाणी प्यायलो तर काय होईल याचा तुम्ही विचार केला आहे का? रोज गरम पाणी पिण्याचेही आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत ते कोणते जाणून घेऊया आजच्या लेखात.

रोज गरम पाणी प्यायलाने शरीरात होतात ‘हे’ बदल! | What Are the Benefits of Drinking Hot Water?

पोटाच्या आजारांपासून सुटका

असं म्हंटलं जातं, की माणसाचं पोट साफ असेल तर त्याची अनेक आजारांपासून सुटका होते. हल्ली कामाच्या व्यापात आपल्याला योग्य आहारासाठी आवश्यक तेवढा वेळ देता येत नाही. आपण झटपट होणारे पदार्थ खाणं अधिक सोयीचं समजतो. या गरजेपोटी आपण मैदायुक्त पदार्थ, साठवलेले पदार्थ (प्रीझरव्हेटीव्हस), तिखट, तेलकट, जंकफूड असे न पचणारे पदार्थ खात असतो. त्यामुळे पचनक्रियेवर याचा परिणाम होतो. खाल्लेले पदार्थ पचले नाहीत, तर आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण अधिक वाढत जातं. नंतर चरबी कमी करण्यासाठी, पोटाची पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी आपण जिम लावतो किंवा वेगवेगळी औषध घेतो. पण दररोज गरम पाणी प्यायल्याने आपलं रोज सकाळी पोट साफ होतं त्याच बरोबर आपल्या पोटातील आतड्या आक्रसल्या जातात. आणि पचनक्रिया सुरळीत होते. शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

कॉफी, चहा सोडा गरम पाणी प्या

काम करता करता आळस आला किंवा झोपेतून जाग यावी म्हणून आपण कॉफी किंवा चहाचं सेवन करतो. आपला आळस, झोप घालवण्यासाठी आपण वारंवार चहा-कॉफी घेत असू, तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. आपली भूक कमी होते किंवा भूक लागत नाही. शरीरात पित्ताचं प्रमाण वाढतं. चहा, कॉफीमधल्या साखरेच्या अती सेवनामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊन कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे चहा, कॉफी पिण्याऐवजी आपण गरम पाण्याचं सेवन केलं तरी देखील आपली झोप कमी होते आणि घशाला मिळालेल्या गरम पाण्यामुळे लगेचच फ्रेश वाटतं.

तुकतुकीत त्वचेसाठी गरम पाणी फायद्याचे

आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे, की रोज दोन ते तीन लिटर पाणी आपल्या सर्वांच्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित राहतं, कोरडेपणा येत नाही. आपण गरम पाणी प्यायलो तर आपल्या त्वचेवरही छान तुकतुकीतपणा येतो, चेहरा उजळतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर येणारी मुरुमं कमी होतात.

नाकाच्या, घशाच्या आजराला दूर करा

वाढत्या प्रदूषणामुळे आपण रोज मातीच्या, धुळीच्या कणांना सामोरं जात असतो. त्यामुळे ते धुळीचे कण आपल्या नाकातून तोंडातून शरीरात जातात. घशाचे आजार निर्माण होतात शिवाय वारंवार सर्दी होते. पण जर आपण रोज गरम पाणी पित असू तर त्यामुळे या सगळ्या आजराला कायमचं दूर ठेवता येतं.

वजन नियंत्रणात राहतं

हल्ली व्यायाम करायला वेळ मिळत नाही किंवा एका जागेवर बसून काम करावं लागतं. अशावेळी शरीराची आपलं वजन वाढतं. मग या वर पर्याय काय तर रोज सकाळी केवळ एक ग्लास गरम पाणी आणि लिंबू याचं सेवन तुम्ही करू शकता. त्याने वजन नियंत्रणात येऊ लागतं. सकाळी गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया लगेचच सुरू होते. आपल्या शरीरातले काही विषद्रव्य निघून जातात. शरीरातील चरबी कमी होतेच पण त्याच बरोबर लिंबामुळे शरीराची विटामिन सी ची कमतरता भरून निघते. गरम पाण्यामुळे आपली मज्जासंस्था देखील चांगल्या पद्धतीने काम करते.

तणाव कमी होतो

तणाव कमी करण्यासाठी अनेक लोक मानसोपचार तज्ञांचे सल्ले घेतात. औषध खातात. पण एकही पैसा खर्च न करता केवळ गरम पाण्यामुळे आपण आपला तणाव घालवू शकतो. तो कसा? रात्री विचारांनी झोप येत नसेल तर जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपल्या मेंदूच्या नसांना काही प्रमाणात उष्णतेच्या संवेदना जाणवतात. शरीरात हलका उबदारपणा निर्माण होतो. शरीर हलकं वाटू लागतं. त्यामुळे तणावाचे निरसन होते.

तर गरम पाणी पिण्याचे असे अनेक फायदे आहेत. तुम्ही गरम पाणी पिण्याची सवय रोज लावून घेतलीत, तर तुम्हालाही शरीरात होणारे बदल जाणवतील आणि तुम्ही एक निरोगी आयुष्य जगू शकाल.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button