लग्न म्हटले की दोन परिवाराचे संबंध. तेव्हा लग्न ठरल्यानंतर निमंत्रण पत्रिका छापण्यापासून ते लग्न ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणाचा हॉल बुक करण्यापर्यंत बरीच तयारी केली जाते
या कालावधीत बराच पैसा खर्च होतो. सर्व तयारी झाल्यानंतर काही कारणांमुळे लग्न मोडले तर दोन्ही कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान होते. तेव्हा अशा परिस्थितीतून वाचायचे असेल तर विवाह पॉलिसी काढून घ्या.
विवाह पॉलिसी काय आहे आणि आपण ती कधी घेऊ शकतो? |Wedding policy rules in marathi
लग्न मोडले तर
मंडपात भूकंप, आग इतर काही धोक्यामुळे लग्न समारंभ रद्द झाल्यास ते पॉलिसीमध्ये येते. विम्याअंतर्गत विवाहस्थळी झालेली चोरी देखील समाविष्ट होते. काही कारणाने वर किंवा वधू लग्नात सहभागी होऊ शकली नाही तर त्यांचा समावेश विवाह पॉलिसी मध्ये आहे.
वैयक्तिक अपघात
आकस्मिक मृत्यू, स्थायी किंवा आंशिक विकलांगतेच्या विमा उतरवता येतो. आणि रक्ताच्या नातेवाईकांना संरक्षण मिळते.
संपत्तीचे नुकसान
विमा पॉलिसीमध्ये आग, भूकंपामुळे संपत्तीचे होणारे भौतिक नुकसान कव्हर केले जाते.
सार्वजनिक दायित्व
पॉलिसी दरम्यान लग्नस्थळावर जखमी होणे, नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळू शकते.
विवाह पॉलिसी तुम्ही या प्रकारे घेऊ शकता?
विवाह पॉलिसी सार्वजनिक, खाजगी विमा कंपनीकडून, थेट एजंटकडून घेऊ शकता. या विवाह पॉलिसी प्रीमियमचा खर्च विम्यावर अवलंबून असतो. लग्नाच्या एका आठवड्यापूर्वी विमान घेता येऊ शकतो.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.