श्री सिद्धिविनायक मंदिराची तीर्थस्थळाची विशेषता तुम्हाला माहित आहे का?

येथील मंदिरात फारच कडक सोवळे पाळले जाते. सर्व पूजा अर्चा पुजारी / उपाध्याय यांच्याकडूनच करण्यात येते. 

ज्या भक्तांना सहस्रावर्तने करायची असतात, त्याची वेळ सकाळी 7 ते 12 अशी आहे.

चिंचवड संस्थानाकडून या देवस्थानाला वर्षासन मिळते.

येथील देवाचे पुजारी हे वंशपरंपरागत आहेत. सेवेकरी हे वंशपरंपरागत आहेत.

येथील मंदिरात चिंचवडचे मोरया गोसावी यांनी प्रथम तपश्चर्या केली आणि श्री विनायकाच्या आज्ञेनंतर ते मोरगावला गेले.

भगवान विष्णू, श्री सिद्धिविनायक, व्यास महर्षी, मोरया गोसावी आदींच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने हे तीर्थक्षेत्र पावन पवित्र झाले आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा.

Next: श्री बल्लाळेश्वर मंदिराची तीर्थस्थळाचीविशेषता तुम्हाला माहित आहे का?

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद