‘व्हॅलेंटाइन डे’ची सुरुवात कधी झाली? | valentine day history in marathi

प्रेमाचा उत्सव म्हणून 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणारा व्हॅलेंटाइन डे जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: तरुणाईमध्ये हा दिवस साजरा करण्याचा उत्साह जास्त दिसून येतो. जोडीदाराचा शोध घेणे, एखाद्या व्यक्तीला आपले प्रेम व्यक्त करून दाखवणे किंवा असलेल्या जोडीदारासोबत हा दिवस आनंदाने व्यतीत करणे, अशा प्रकारे हा दिवस सेलिब्रेट केला जातो. पण या व्हॅलेंटाइन डेची सुरुवात कधी झाली आणि त्यामागची कथा या लेखात जाणून घेऊया.

‘व्हॅलेंटाइन डे’ची सुरुवात कधी झाली? | valentine day history in marathi

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याविषयी नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी या खास दिवसाच्या प्रेरणेमागे अनेक दंतकथा आहेत. त्यापैकी एक कथा अशी आहे की, इ.स. 270 मध्ये रोमन साम्राज्याचा ‘क्लाऊडियस गोथिकस द्वितीय’ नावाचा राजा होता. त्याला प्रेम, विवाह या गोष्टींचा तिरस्कार वाटायचा. विवाहाला तो विरोध करायचा. प्रेम आणि विवाह यामुळे सैनिक आपले लक्ष्य विसरतात, अशी त्याची समजूत होती. या क्लाऊडियस गोथिकस याने आपल्या साम्राज्यात एक आदेश काढला होता. त्यानुसार, कोणताही सैनिक प्रेमात पडणार नाही किंवा विवाह करणार नाही असे निर्बंध लादण्यात आले. विवाह न केल्यामुळे सैनिकांचे मनोबल आणि ताकद वाढते अशी त्याची धारणा होती.

मात्र सैनिकांना हा आदेश बिलकुल पटला नाही. त्यांना त्यांचं कुटुंबीय देशाइतकंच प्रिय होतं. राजा गोथिकसने दिलेल्या आदेशाला संत व्हॅलेंटाइन यांनी विरोध दर्शवला आणि रोमन साम्राज्याला प्रेमाचा संदेश दिला. त्यांनी सैनिकांना राजाच्या विरोधात जाऊन प्रेम करण्याची प्रेरणा दिली. एवढंच नाही, तर त्याने काही सैनिकांचे विवाह करून दिले. राजाला ही गोष्ट समजताच त्याने संत व्हॅलेंटाइन यांना मारण्याचे फर्मान काढले.

संत व्हॅलेंटाइन यांना मारण्याच्या आधी काही दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. ज्या त्यांना दिवशी मारण्यात आले, तो दिवस 14 फेब्रुवारी होता. संत व्हॅलेंटाइनने मृत्युपूर्वी एका जेलरच्या आंधळ्या मुलीला बरे केले असल्याची दंतकथा सांगितली जाते. फाशी जाण्याआधी संत व्हॅलेंटाईनने जेलरच्या मुलीला एक पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये देवावर विश्वास ठेव आणि शेवटी ‘फ्रॉम युअर व्हॅलेंटाइन’ असे लिहिले होते. संत व्हॅलेंटाईन 14 फेब्रुवारी इ.स.269 रोजी मरण पावला होता.

उपलब्ध माहितीनुसार, इ.स. 496 मध्ये पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला होता. पोप गॅलेसियस यांनी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून इ.स.496 मध्ये साजरा करण्याचे ठरवले. तेव्हापासून 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

सन 1260 मध्ये संकलित केलेल्या ‘ऑरिया ऑफ जॅकोबस डी वॉराजिन’ या पुस्तकात संत व्हॅलेंटाइनबद्दल माहिती मिळते. या संताने समाजाला प्रेमाचा संदेश दिला आणि आनंदी राहण्याचा गुरुमंत्र दिल्याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

सुरुवातीला व्हॅलेंटाईन डेला ग्रीटींग कार्ड दिले जायचे. फुल व मिठाई देण्याची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. पुढे 19व्या शतकात इंग्रजी भाषिक जगभर पसरले त्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या प्रथा इतर देशांमध्ये पसरल्या ज्यात हॅलोविन, ख्रिसमस या सारख्या प्रथांचा देखिल समावेश आहे. व्हॅलेंटाईन डे अनेक पूर्व आशियाई देशांमध्ये साजरा केला जातो. भारतात तरुण प्रेमी युगुलांकडून मोठ्या प्रमाणत व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जातो. एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. कुठे प्रेमाला व्यक्त करतात तर कुठे त्याचा स्वीकार होत असताना आपण यादिवशी पाहतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या व्हॅलेंटाईन डेला तुमचा काय प्लॅन असणार आहे, हे कमेंटमध्ये सांगा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ