आजच्या घडीला बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केटच्या बाजारातील असुरक्षिततेच्या परिस्थितीत आज लोक सुरक्षित पर्यायांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे परिणामी तुमच्या मनात हा प्रश्न रेंगाळत असेल की सुरक्षिततेसह पैसे कमी कालावधीत दुप्पट करून शकणारा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय कोणता आहे?
जाणून घेऊयात कमी कालावधीत पैसे दुप्पट करणारे गुंतवणुकीचे पर्याय | Top 6 best investment plans in India
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही प्रामुख्याने मुलींसाठी चालवली जात आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या खाते उघडले तर तुमचे पैसे 9.4 वर्षात दुप्पट होतील. सध्याच्या घडीला सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक 7.6% दराने व्याजदर मिळत आहे.
किसान विकास पत्र योजना (KVP)
KVP अर्थात किसान विकास पत्र हे सरकारी योजना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना आहे. या योजनेमध्ये सध्या वार्षिक 6.9% हमी व्याजदर मिळत आहे. त्यामुळे या परिस्थितीत ह्या योजनेचा पर्याय 10.43 वर्षात तुमचे पैसे दुप्पट करेल.
बँक एफडी (FD)
रिझर्व बँकेच्या रेपो दरात वाढ केल्यानंतर बहुतांश बँका त्यांच्या एफडीचे व्याजदर वाढवत आहेत. सध्याच्या घडीला एफडीवर सरासरी 6 टक्के व्याजदर दिले जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचे पैसे येते कमी कालावधीत दुप्पट होण्यासाठी सरासरी 12 वर्षे लागतील.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे देखील गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि यामध्ये सध्याच्या घडीला 7.1 टक्के वार्षिक दराने व्याजदर मिळत आहे. त्यामुळे पीपीएफ (PPF) मध्ये तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 10.14 वर्ष लागतील.
हे सुध्दा वाचा – आर्थिक चिंता दूर करण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC)
NSC अर्थात नॅशनल सेविंग सर्टिफिकेट हे देखील केंद्र सरकार मार्फत चालवली जाणारी एक लघु बचत योजना आहे. आणि विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सध्या वार्षिक 6.8 टक्के दराने व्याजदर मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक गुंतवलेले पैसे 10.58 वर्षात दुप्पट होतील.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
NPS अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजनेचे हे खाते प्रत्येकाच्या नावाने उघडता येते. विशेष म्हणजे सरकारी आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रात काम करणारे हे खाते उघडू शकतात. गेलं काही वर्षांमधील कामगिरीवर नजर टाकल्यास ज्या फंडांनी इक्विटीमध्ये 50% हून अधिक गुंतवणूक केली आहे. त्यांनी या खात्यात 10 ते 12 टक्के परतावा दिला आहे. जर आपण अभ्यासपूर्वक वार्षिक 10 टक्के परतावा पाहिले तर तुमच्याकडील पैसे 7.2 वर्षात दुप्पट होतील.
Note – मित्रांनो या सगळ्या योजनेचे व्याजदर हे कमी जास्त होत असतात. त्यामुळे गुंतवणूक (Best investment plans) करण्याच्या पहिले या योजनेचे व्याजदर एकदा नक्की तपासून पहा.
Note 2 – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.