शेतकरी वर्गासाठी या विशेष 5 योजना ठरतायत लाभकारक, जाणून घेऊयात या योजनेबद्दल थोडक्यात माहिती

आपल्या भारत देशात जवळपास प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा प्रामुख्याने महत्त्वाचा उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू वर्गाला मदत करणे होय. यामध्ये प्रामुख्याने रोजगार, आरोग्य, विमा, रेशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारत सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवते. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात. तर जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने लाभदायक अशा महत्त्वाच्या योजना.

शेतकरी वर्गासाठी या विशेष 5 योजना ठरतायत लाभकारक | Top 5 Central Government Schemes for farmers in India

पीएम किसान सन्मान निधी योजना

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकार अर्थात भारत सरकार मार्फत चालवली जाते. देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ उठवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मिळतात. जे प्रत्येक 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतात.

प्रधानमंत्री कुसुम योजना

प्रधानमंत्री कुसुम योजना या योजनेअंतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के कर्ज देत आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनाअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौरपंप किंवा ट्यूबवेल बसवू शकतात.

पीएम किसान मानधन योजना

पीएम किसन मानधन योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळते. परंतु तुम्हाला याआधी तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही 18 ते 40 वयोगटातील असल्यास तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्ही 18 वर्षाचे असाल तर तुम्हाला दर महिन्याला 55 रुपये प्रीमियम भरावे लागेल.

रयथू बंधू योजना

भारतातील तेलंगणा राज्य सरकार ही योजना राबविते. तसेच रयथू बंधू योजनेचा अभ्यास इतर राज्यातील राज्ये सरकारे देखील करत आहेत. या योजनेअंतर्गत राज्य सरकार योजनेत बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य पाठवते. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर जमीन क्षेत्र असणे आवश्यक आहे.

कुपनलिका योजना (Tube well scheme)

भारतातील फक्त उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. कारण ही योजना फक्त यूपी राज्य सरकार चालवते कुपनलिका योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात कुपनलिका बसवू शकतात. विशेष म्हणजे कुपनलिका योजनेचा लाभ कसा आपल्या शेतकऱ्यांना होईल हा विचार इतर राज्ये सरकारे देखील करत आहेत.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ