आर्थिक नियोजन करताना काय लक्षात ठेवायचे ?

मित्रांनो या पहिलेच्या पोस्टमध्ये आपण या पहिले आपणं, आर्थिक नियोजन म्हणजे काय? हे जाणून घेतलं.आता आपण आर्थिक नियोजन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे जाणून घेणार आहोत.

आर्थिक नियोजन करताना काय लक्षात ठेवायचे ? | Top 10 Things to Keep in Mind when Planning your Finances in marathi

  • बचत (savings) आणि गुंतवणूक (investment) या वेगळ्या गोष्टी आहेत. नुसती बाजूला काढून ठेवलेली रक्कम म्हणजे बचत आणि गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांकडे आपली बचत वळवणे. त्यासाठी बचत हे पहिले पाऊल आहे.
  • तुमची आर्थिक उद्दिष्टे जास्तीतजास्त स्पष्ट आणि मोजता येणारी हवीत. उदाहरणार्थ, मला श्रीमंत व्हायचे आहे असे मोघम उद्दिष्ट ठरवण्याऐवजी, पुढील 10 वर्षांनी माझी संपत्ती 50 ते 60 लाख रुपये एवढी असेल, असे उद्दिष्ट ठरवता येते. कारण त्यासाठी योजना आखून त्याप्रमाणे उद्दिष्ट साध्य होते आहे की नाही हे तपासता येते.
  • महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी त्याचे इतर आर्थिक परिणाम काय होतील हे तुम्ही बघितले पाहिजे.जर तुम्ही तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद केली नसेल तर त्यासाठी निवृत्तीच्या तरतुदीतून पैसे वळवावे लागतील किंवा कर्जाने पैसे घ्यावे लागतील.
  • आर्थिक नियोजन हे सर्वांसाठी आहे. मर्यादित पैशातून आपली उद्दिष्टे साधायची असतील, तर योग्य नियोजनाला पर्याय नाही. किंबहुना जेवढे पैसे कमी तेवढी नियोजनाची गरज अधिक. कारण कमी साधनांमधून जास्त साध्य करायचे असते.

हे वाचा- आर्थिक नियोजन म्हणजे काय ? थोडक्यात जाणून घेऊया.

  • आजची कृती हे उद्याचे फळ आहे, हे विसरू नका. तरुण वयापासूनच आर्थिक योजना तयार असणे फायदेशीर असते. कारण त्या वयात जी कृती केली जाते त्याची फळे नंतरच्या आयुष्यात मिळतात. बऱ्याच जणांना वाटते की तरुण वयात पैसा फक्त मिळवायचा आणि पाहिजे तसा खर्च करायचा. निवृत्तीचे नियोजन नंतर बघता येते, हा गैरसमज आहे.
  • एकदा तयार केलेली आर्थिक योजना ही काही अंतिम नसते.त्यात वेळोवेळी परिस्थितीनुसार बदल करणे आवश्यक ठरते. कारण गृहीत धरलेल्या अनेक गोष्टींमध्ये आयुष्यातील विविध टप्प्यांवर पुढे बदल होत राहतो. उदाहरणार्थ,नोकरीतील किंवा कौटुंबिक परिस्थितीतले बदल
  • आपल्या गुंतवणुकीवर वाजवी (रिझनेबल) दराने परतावा मिळेल अशी अपेक्षा ठेवावी, भरमसाट (म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा खूप जास्त) अपेक्षा ठेवल्याने निराशा पदरी पडेल.
  • आर्थिक नियोजनामध्ये जोखीम संरक्षण (विमा) आणि प्राप्तिकरनियोजन या दोघांचा समावेश असला पाहिजे. कारण आयुष्यात अनपेक्षित धक्के बसू शकतात, त्यासाठी आर्थिक तरतूद करणे शहाणपणाचे ठरते. परंतु करनियोजनाला अर्थनियोजन मानण्याची चूक करू नये. 9. तुम्ही तयार केलेली योजना क्लिष्ट नसावी आणि त्यात इतरांची नक्कल नको, न पेलवणाऱ्या गुंतवणूक प्रकारांचा (इतरांनी केले म्हणून) त्यात समावेश करू नये. उदाहरणार्थ, जर फ्यूचर्स / ऑप्शन या प्रकाराची पूर्ण माहिती नसेल तर त्या वाटेला न जाणे इष्ट ठरेल.
  • अर्थ नियोजनातल्या बारकाव्यांची जर तुम्हांला पुरेशी माहिती नसेल तर नियोजन करताना व त्याच्या अंमलबजावणीकरता तुमच्या विश्वासू आर्थिक सल्लागाराची जरूर मदत घ्यावी.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button