Tomato हे मूळचे अमेरिकेतील फळ आहे.आपल्याकडे खाण्याचा त्याचा सरासरी वापर केला जातो. टोमॅटो शिवाय भाजीच्या रसाला चव नाही. त्यामुळे या फळाचा मोठ्या प्रमाणात वापर आपल्याकडे होतो. भाजी, सूप, कोशिंबीर,
केचअप असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटो मधील लोह, फॉस्फरस,’अ’, क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. टोमॅटो हा मधुमेहासाठी, हृदयरोगासाठी उत्तम मानला जातो. आज आपण टोमॅटोचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
टोमॅटो खाण्याचे फायदे- benefits of tomato
सुंदर त्वचा:-
टोमॅटोमध्ये ‘लाईकोपिन’ नावाचे ऑक्साइड असते.या ऑक्साईड मुळे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होते. चेहऱ्यावरील काळ्या रंगाचे डाग घालवण्यासाठी टोमॅटोचा खूप फायदा होतो. त्वचेवर टोमॅटोची साल लावल्याने त्वचा चकचकीत आणि उजळते.
हाडे मजबूत करण्यासाठी:-
टोमॅटोमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. टोमॅटोमध्ये लाईग्कोपीन नावाचे आँटी ऑक्सिडेंट असते त्यामुळे हाडांमधील मास टिकवून ठेवण्यास मदत होते.
डोळ्यांच्या आजारावर गुणकारी:-
टोमॅटो मधील विटामिन ए आणि सी मुळे एखाद्याला रातांधळेपणा असल्या त्याच्यासाठी हे फायदेशीर ठरते. तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांनी रोजच्या आहारात टोमॅटोचा वापर केल्यास त्यांच्या डोळ्यांना आराम मिळतो.
लांब आणि काळे केस:-
टोमॅटो मधील विटामिन ए आणि लोह यामुळे केसांची चांगली वाढ होते आणि केस काळे हे राहतात. आणि केस गळती सुद्धा थांबते. केसांमध्ये खाज येत असेल तर केसांना शाम्पू लावून आंघोळ केल्यानंतर केसांना टोमॅटोचा रस लावावा. आणि ते पाच मिनिटानंतर थंड पाण्याने केस धुऊन घ्यावेत. त्यामुळे केसांमधील खास कमी होण्यास मदत होईल.
टीप:- हा प्रयोग रोज करु नये. महिन्यातून फक्त एक वेळा करावा.
शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते:-
ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना टोमॅटो खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये कार्बोहाइड्रेट असते हे कार्बोहायड्रेट लघवीतील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवते. तसेच टोमॅटो शरीरातील साखर आणि फायबरचे प्रमाण सुद्धा नियंत्रण ठेवते. वजन कमी करणाऱ्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी टोमॅटो अति गुणकारी आहे.
कॅन्सर पासून मुक्तता:-
राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या जर्नल मधील एका लेखात असा उल्लेख आहे की, टोमॅटो खाल्ल्याने प्रोटेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. टोमॅटोमधील लाईग्कोपीन ऑक्सिडेंटमुळे कॅन्सरच्या पेशी कमी करते. तसेच कोलन आणि कोलेस्ट्रॉल कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:-
दिवसातून किमान तीन टोमॅटो खाल्ले तर वजन कमी होण्यास चांगली मदत मिळते. टोमॅटोमध्ये कोलेस्ट्रॉल, पाणी आणि फायबर असते. त्यामुळे शरीरातील जास्त कॅलरीज न जाता लवकर पोट भरण्यास मदत होते.
चांगली झोप येण्यास मदत होते:-
टोमॅटो मध्ये विटामिन सी असते त्यामुळे रोज रात्री जेवताना आपल्या आहारात टोमॅटो खाल्ल्यास आपल्याला शांत झोप लागू शकते.
उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत:-
ज्यांना bp चा त्रास आहे त्यांनी रोजच्या आहारात टोमॅटो चा वापर करावा.आहारात पोटॅशियमचे प्रमाण असेल तर, उच्च रक्तदाब वाढू शकतो. रोज एक ताजे टमाटे खाल्ल्याने शरीराला एक दिवसासाठी लागणारे 11.4 टक्के पोटँशियम मिळते.
शरीरावरील सूज कमी करण्यास मदत:-
एखादी जुनी सूज असेल किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर अशा रुग्णांनी आपल्या रोजच्या आहारात टोमॅटोचं जास्तीत जास्त वापर करावा.
Note – मित्रांनो एकदा तूम्ही तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांना विचारून ही प्रोसेस करा. जर तुम्हाला Tomato benefits in marathi ही माहिती फायदेशीर वाटत असल्यास शेअर जरूर करा.