तिरफळ (Tirphaḷ) लालसर, हिरवट रंगाचे वाटाण्यासारखे असते. सुकल्यावर या फळाचे दोन भाग होतात. यात मिऱ्यासारखे दाणे असतात. हे दाणे चवीला तिखट असतात.
तिरफळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Tirphaḷ health benefits in marathi
- तिरफळाची पूड आल्याच्या रसातून घेतली असता पोट फुगण्याचा त्रास कमी होतो व शौचासही साफ होते.
- वातविकारांमध्ये अंगातून कळा येतात अशा वेळेस तिरफळाची पूड मधातून दिवसातून दोनदा घ्यावी.
- तिरफळाची पूड मधामधून घेतल्यास वांती होणे, उचकी लागणे बरे होते तर सकाळ-संध्याकाळ घेतल्यास भूक लागते व अन्नपचनही होते.
हे सुध्दा वाचा:– मिठाचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- घसा बसल्यास तिरफळाचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.
- तिरफळाचे बारीक चूर्ण करावे व गुळामध्ये मिसळून त्या छोट्या छोट्या गोळ्या दिवसातून दोनदा घेतल्यास अजीर्ण व अपचनाचा त्रास कमी होतो.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.