अन्नधान्य टिकवण्यासंबंधीच्या महत्त्वाच्या टिप्स | Tips for Proper Food Preservation

नमस्कार मित्रांनो, आज आपण अन्नधान्य टिकवण्यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. आपल्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर राहणार आहेत. अन्नधान्य टिकवण्यासंबंधी कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ह्यासाठी ही पोस्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग जाणून घेऊया.

अन्नधान्य टिकवण्यासंबंधीच्या महत्त्वाच्या टिप्स | Tips for Proper Food Preservation

तांदूळ

100 किलो तांदुळाला 150 ते 200 ग्रॅम बोरीक पावडर चोळून लावावी व घट्ट झाकणाच्या डब्यात तांदूळ भरून ठेवावेत. वर्षभर चांगले राहतात.

टीप- बोरीक पावडर लावताना तांदूळ चादरीवर ओतावे व बोरीक पावडर लावावी.

गहू

100 किलो गव्हालाई किलो दिवेल तेल (एरंडेल तेल) चोळून लावावे किंवा 2-3 दिवस उन्हात वाळवून डब्यात भरावेत.
टीप- मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी जिकडे पाऊस कमी असतो तिथे गहू न वाळवता फक्त दिवेल तेल लावून ठेवले तरी गहू चांगले राहतात. परंतु कोकणात व जिकडे पाऊस खूप असतो तिथे गहू उन्हात वाळवले तरच चांगले राहतात. गहू उन्हात वाळवल्यावर दिवेल तेल लावू नये.

ज्वारी, बाजरी, नाचणी

100 किलो गव्हालाई किलो दिवेल तेल (एरंडेल तेल) चोळून लावावे किंवा 2-4 दिवस उन्हात वाळवून डब्यात भरावेत.
टीप- मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी जिकडे पाऊस कमी असतो तिथे गहू न वाळवता फक्त दिवेल तेल लावून ठेवले तरी गहू चांगले राहतात. परंतु कोकणात व जिकडे पाऊस खूप असतो तिथे गहू उन्हात वाळवले तरच चांगले राहतात. गहू उन्हात वाळवल्यावर दिवेल तेल लावू नये.

चणाडाळ, तुरडाळ, मूगडाळ, उडीदडाळ व सर्व कडधान्ये

सर्व डाळी व मूग-मटकीसारखी सर्व कडधान्ये यांना 2-3 दिवस कडक उन्हात वाळवावे व घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.

टीप- कोकणासारख्या पाऊस जास्त पडणाऱ्या भागात जास्त उन्हे द्यावीत.

वाल

वाल 7 दिवस उन्हात वाळवावेत व भरून ठेवावेत. ऊन थोडे कमी दिले तर एरंडेल तेल चोळून लावावे व घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत.

धणे, जिरे, बडीशेप, मोहरी, खसखस व इतर गरम मसाले

सर्व गरम मसाले ताटात किंवा चादरीवर पसरून 2 दिवस कडक उन्हात वाळवावेत व घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत.

खारीक, बदाम, पिस्ता, बेदाणे, मनुका, सुके अंजिर, वगैरे सुका मेवा

सर्व सुका मेवा ताटात पातळ पसरून 2-3 दिवस कडक उन्हात वाळवावा व बरणीत भरून ठेवावा.
टीप- सुका मेवा न वाळवता फ्रीजमध्ये ठेवला तरीही चांगला राहतो.

सुके खोबरे

सुके खोबरे 4-5 दिवस कडक उन्हात वाळवावे व घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा डाळीच्या डब्यात घालून ठेवावे.

टीप- सुके खोबरे 4-6 महिने लागेल तेवढेच वाळवून ठेवावे. कडक ऊन मिळाले नसेल तर खोबऱ्याला 4-6 महिन्यांनी काही वेळा खवट वास येऊ लागतो.

शेंगदाणे

3-4 दिवस कडक उन्हात वाळवावेत व डब्यात भरावेत.

चिंच

चिंचेच्या बिया काढून मीठ लावून 3-4 दिवस चिंच वाळवावी व बरणीत भरावी. चिंचेचे गोळे करावयाचे असल्यास चिंच चाळणीत किंवा परडीत घेऊन धुवावी व पाणी निथळून गेल्यावर चिंचेत मीठ घालून खलबत्त्यात चिंच थोडी कुटावी लाडवाएवढे गोळे करून 5-7 दिवस कडक उन्हात वाळवावेत व भरून ठेवावेत.

सुका कोलीम, काड (करंदी), सोडे, बोंबील वगैरे सुका बाजार

सर्व सुका बाजार 2 दिवस कडक उन्हात वाळवावा व घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा बरणीत भरून ठेवावा.
टीप- कोलीम वाळल्यावर चाळावा व निवडून भरावा. सुकी करंदी किंवा काड चांगली वाळल्यावर तिची डोकी, शेपटी मोडून टाकावेत व डब्यात भरावी.

सुक्या मिरच्या

2-3 दिवस उन्हात वाळवून देठ मोडून बरणीत भरून ठेवाव्यात.

रवा व वरी तादूंळ

रवा कोरडाच गरम होईपर्यंत कढईत परतून भाजावा किंवा ओव्हनमध्ये गरम करून थंड झाल्यावर डब्यात ठेवावा.
टीप- रवा विकत आणल्यावर लगेचच भाजला नाही तर त्यात किडे व टोके पडतात.

मैदा

मैदा फ्रीजमध्ये ठेवावा किंवा बाहेर ठेवायचा असल्यास वरती धान्यरक्षकात कापसाचा बोळा बुडवून ठेवावा.

हिरवे वाटाणे

ओले वाटाणे सोलून दाणे छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून सील करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास वर्षभर चांगले राहतात. मात्र पिशवी एकदा बाहेर काढून फोडल्यावर थंडपणा गेल्यावर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवू नयेत. खराब होतात.

ओले काजू

ओले काजू पुठ्याच्या बॉक्समध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास वर्षभर चांगले राहतात. काजू फ्रीजबाहेर ठेवायचे असल्यास 7-8 दिवस कडक उन्हात कडकडीत कोरडे होईपर्यंत वाळवावेत व घट्ट बरणीत भरून ठेवावेत.
टीप- काजू चांगले वाळल्यावर त्याचे साल हाताने चोळल्यावर पटकन निघते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button