एका स्मार्टफोनमध्ये बरेचं फीचर्स ठरलेले असतात. यामध्ये पॉवर बटन, व्हॉल्युम बटन, चार्जिंग पोर्ट, फ्रंट कॅमेरा, स्पीकर, इयरपीस आणि रियर कॅमेरा या गोष्टींचा समावेश असतो. पण या सगळ्या बरोबर एक बरिक होल सुध्दा दिलेला असतो. प्रत्येकाला असावा असा प्रश्न पडतो. हा फक्त होल नाही तर, हा होल स्मार्टफोनसाठी खूप महत्वाचा आहे.
अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, हा एक माईक (mic) आहे. हा होल फक्तसमोरच्या व्यक्तीपर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्याचं काम करत नाही तर नॉइज कॅन्सलेशनचं काम सुध्दा हा होल करतो. मोबाईल मधील हे फिचर कॉलिंगच्या वेळी अॅक्टिव्हेट होते. यामुळे तुमचा आवाज स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. नॉइज कॅन्सलेशनमध्ये तुमच्या आजूबाजूचा आवाज कमी केला जातो आणि तुमच्या आवाजावर जास्त भर दिला जातो.
त्यामुळे हा होल जर तुम्ही बुजवला, त्यावर हात ठेवला किंवा त्यात काही अडकलं तर कॉलमध्ये तुमचा आवाज कमी होऊ होतो. किंवा बॅकग्राऊंड नॉइज वाढून तुमचा आवाज त्यात दबून जातो. म्हणून हा होल नेहमी क्लियर असला पाहिजे. म्हणून बाजारात काही हेडफोन सुध्दा आहे जे नॉइज कॅन्सलेशनचं काम करतात. पण त्या हेडफोनची किंमत महाग असते.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.