शेअरबाजार आणि इतर बाजारात महत्त्वाचा फरक काय? |The Difference Between a Capital Market and the Stock Market

भाजी मंडई, मच्छी बाजार, मोढा आणि कपड्यांचे मार्केट यांसारखे अनेक बाजार आहेत पण आपल्याला प्रश्न पडतो की या बाजारात आणि शेअर बाजारात नेमका आणि महत्त्वाचा फरक काय? चला तर जाणून घेऊया नेमका फरक काय आहे.

शेअरबाजार आणि इतर बाजारात महत्त्वाचा फरक काय? |The Difference Between a Capital Market and the Stock Market

या बाजारातील फरक म्हणजे व्यवहारातीय सोपेपणा. समजलं नाही ? चला तर एका उदाहरणासह समजून घेऊया.

उदाहरणार्थ

भाजी मंडई बाजार आणि शेअरबाजार यांपैकी कोणत्या बाजारातील व्यवहार समजायला सोपे आहेत? उत्तर सोपं आहे – भाजी मंडई बाजार! कारण येथील व्यवहार खूप सोपे असतात. यात जास्त कॅल्क्युलेशन करण्याची किंवा अभ्यास करण्याची गरज नसते.

इतर बाजार आणि शेअरबाजार यांतील महत्त्वाचा दुसरा फरक म्हणजे, इतर बाजारात खरेदा-विक्री करणारे लोक व्यवहार करण्यासाठी एकमेकांसमोर येतात. शेअरबाजारात मात्र ब्रोकरच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्यामुळे खरेदीदार आणि विक्रेता व्यवहारांसाठी एकमेकांसमोर येत नाहीत.

हे वाचा- शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात?

तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे, इतर बाजारात खरेदीदार स्वतः बाजारात जाऊन, वस्तूची रक्कम देऊन त्या वस्तूचा प्रत्यक्ष ताबा लगेच घेतो. शेअरबाजारात मात्र असं होत नाही. व्यवहार झाल्यानंतर शेअरचं हस्तांतरण आणि पैसे देण्याचा व्यवहार थोड्या कालावधीनंतर होतो.

मित्रांनो तुम्हाला शेअरबाजार आणि राष्ट्रगीत इतर बाजार मधील फरक समजलात असेल. तर मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात. या विषयावर आणखी पोस्ट येणार आहेत त्या नक्की वाचा. आणि हो आपल्या Shares_Dnyan आणि Dnyan_shala या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.

Leave a Comment

error: ओ शेठ