स्वामी विवेकानंद यांचा जीवन प्रवास…| Swami vivekananda biography in marathi

स्वामी विवेकानंद हिंदू आध्यात्मिक नेते, तत्त्वज्ञ व समाजसुधारक होते. पाश्चात्य जगाला वैदिक तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे ते पहिले भारतीय तत्त्वज्ञ होते असे मोठ्या प्रमाणावर मानले जाते. 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रवक्ते म्हणून ते सहभागी झाले.1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशन या सेवाभावी, स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

स्वामी विवेकानंद यांचा जीवन प्रवास…| Swami vivekananda biography in marathi

नरेंद्र दत्त हे विवेकानंदांचे मूळ नाव. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 या दिवशी झाला. प्रख्यात वकील नरेंद्रनाथ दत्त आणि भुवनेश्वरीदेवी हे त्यांचे आईवडील. लहानपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि चुणचुणीत होते. 1897 मध्ये त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात असताना पाश्चात्य तत्त्वज्ञानावर लिहिलेली पुस्तके त्यांच्या वाचनात आली. या पुस्तकांच्या वाचनातून त्यांच्या जिज्ञासू मनाचे समाधान झाले नाही. 1881 मध्ये विवेकानंदांची त्यांचे गुरू श्री रामकृष्ण यांच्याशी भेट झाली. श्री रामकृष्ण हे कालीमातेच्या मंदिराचे पुजारी होते. रामकृष्णांची शिकवण आणि जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन यांचा विवेकानंदांवर सखोल प्रभाव पडला.

स्वामी विवेकानंद यांच्या कुटुंबाबद्दल माहिती | Swami vivekananda family details

वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर गुरू रामकृष्णांच्या आश्रमात त्यांना समाधान मिळाले. 1885 मध्ये रामकृष्ण यांना घशाचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यामुळे त्यांना कोलकाताहून प्रथम श्यामपुकुर आणि त्यानंतर कोस्सीपोरे येथे नेण्यात आले. विवेकानंद व त्यांचे मित्रही आपल्या गुरूंसोबत तेथे गेले. श्री रामकृष्णांनी त्यांना सर्वसंगपरित्याग आणि परस्परांमध्ये बंधुभाव यांसाठी प्रेरित केले.मध्ये रामकृष्णांच्या मृत्यूनंतर विवेकानंद व त्यांचे मित्र बारानगर ऑगस्ट 1886 येथील मोडकळीस आलेल्या एका इमारतीत राहिले. 1887 च्या जानेवारीत त्यांनी संन्यास घेण्यासाठी अधिकृत दीक्षा घेऊन नवीन नावे धारण केली.

1890 मध्ये, आयुष्यातील महान ध्येयाच्या पूर्ततेसाठी विवेकानंदांनी नव्यानेच स्वीकारलेल्या संन्याशी आयुष्याचा त्याग केला आणि एक परिव्राजक म्हणून आपले नवीन आयुष्य सुरू केले. भारतभ्रमणादरम्यान लोकांचे दु:ख, गरिबी आणि मागासलेपण पाहून त्यांना अतीव दुःख झाले. भारतातील लोकांना दोन प्रकारच्या ज्ञानांची गरज आहे असे त्यांना वाटत होते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचे ज्ञान, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास रुजवण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान. भारताला येथील लोकांशी बांधिलकी असणाऱ्या एका संघटनेची गरज आहे. याची त्यांना जाणीव झाली. कदाचित ही गरजच त्यांना ‘रामकृष्ण मिशन’ च्या स्थापनेकडे घेऊन गेली.

देशभ्रमणादरम्यानच त्यांना 1893 मध्ये शिकागो येथे होऊ घातलेल्या जागतिक धर्म परिषदेबद्दल समजले. महान धार्मिक नेते रामकृष्ण परमहंस यांच्या संदेशाचा प्रसार व्हावा असे त्यांना वाटत होते. चेन्नई येथील त्यांचे शिष्य, खेत्रीचे महाराज यांनी त्यांच्या शिकागोपर्यंतचा प्रवास आणि तेथील वास्तव्य यांसाठीच्या खर्चाचा निधी संकलित केला. अशा रीतीने ते 31 मे 1893 या दिवशी अमेरिकेला जाण्यासाठी निघाले..

शिकागोला पोहोचल्यावर त्यांना कळले की त्यांच्याकडे अधिकृत प्रमाणपत्र नसल्याने धर्म परिषदेत बोलण्यास परवानगी मिळणार नाही. हार्वर्ड विद्यापीठातील एक प्राध्यापक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी विवेकानंदांना विश्वसनीय प्रतिनिधी होण्यास मदत केली. 11 सप्टेंबर 1893 रोजी धर्म परिषदेच्या पहिल्या दिवशी विवेकानंदांना परिषदेत बोलण्याची संधी मिळाली. ‘अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो’ अशा वेगळ्या शब्दांनी त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. या अनोख्या संबोधनामुळे ते परिषदेतील सर्वांत लोकप्रिय वक्ते ठरले. वैश्विक धार्मिक सहिष्णुता या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली.

परिषदेनंतर काही काळ अमेरिकेत राहून विवेकानंदांनी विविध शहरांमध्ये व्याख्याने दिली. 1895 मध्ये त्यांनी इंग्लंड आणि उर्वरित युरोपला भेट दिली. तेथे त्यांची भेट मागरिट नोबेल यांच्याशी झाली. याच मागरिट नंतर विवेकानंदांच्या एक प्रसिद्ध शिष्या झाल्या. 1897 च्या सुरुवातीस ते भारतीय उपखंडात पुन्हा परतले. त्याच वर्षी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी आणि त्यांच्या अनुयायी संन्याशांनी बेलुर मठ येथे आपले मुख्यालय उभारले. धर्म आणि तत्त्वज्ञानाबद्दल प्रवचन देण्यासाठी त्यांनी 1899 मध्ये पुन्हा एकदा जगप्रवास केला. 4 जुलै 1902 या दिवशी त्यांचे निधन झाले.

Note: जर तुमच्याकडे Biography of Swami vivekananda in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Swami vivekananda information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button