IPS अधिकारी ‘शालिनी अग्निहोत्री’ यांचा प्रेरणादायी प्रवास | Success story of Shalini Agnihotri in marathi

मित्रांनो UPSC म्हंटलं तर प्रचंड मेहनत आणि मेहनत या शिवाय पर्याय नाही. हे सर्वांना माहीत आहे. यश हे सर्वांना पहिल्याच प्रयत्नात मिळत नाही. काहींना जणांना दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात मिळत. पण मित्रांनो यश कोणत्याही, कितव्याही प्रयत्नात असो मिळवणं गरजेचे आहे.आणि असाच काही प्रचंड मेहनत आणि खडतर प्रवास पूर्ण केला आहे शालिनी यांनी.

शालीनी अग्निहोत्री (IPS Officer Shalini Agnihotri) या हिमाचल प्रदेश मधल्या एका छोट्याशा गावात राहायच्या. तिथेच त्यांचे पूर्ण बालपण गेलं. शालिनी यांचे वडील एक बस कंडक्टर होते.त्यांच्या वडिलांना वाटायचं की शालिनी यांनी एक अधिकारी व्हावे. हेच स्वप्न उराशी बाळगून शालिनी यांनी अधिकारी बनवायचं ठरवलं.

त्या अभ्यासात हुशार होत्या. शालिनी या शाळेत असल्यापासूनच त्यांनी ठरवलं होतं की आपण शासकीय अधिकारी बनायचं, म्हणूनच त्या शाळेत असतानाच तयारीला लागल्या होत्या.शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण शहरात हॉस्टेलला राहून पूर्ण केलं. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं.

हे वाचा- डॉक्टरची नोकरी करता करता झाले IAS अधिकारी

शालिनी या UPSC च्या परीक्षेची तयारी करत आहे, याची कल्पना त्यांनी कोणालाच दिली नव्हती. कारण त्यांना परीक्षेत अपयश होण्याची भीती वाटत होती. पण म्हणतात ना प्रयत्नाअंती परमेश्वर तसंच काही घडलं.2011 साली त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि ऑल इंडिया 285 वा रँक मिळवत,त्यांचं आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.शालिनी या त्यांच्या बेधडक केलेल्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची गुन्हेगारांमध्ये एक दहशत आहे.

एका घटनेने त्यांच आयुष्य बदलले असं त्या सांगतात. शाळेत असताना शालिनी या त्यांच्या आई सोबत बस मध्ये प्रवास करत होत्या त्यांची आई आणि त्या बसमध्ये एका शीटवर बसलेल्या होत्या. त्याच सीटवर एक पुरुषही बसलेला होता. त्या व्यक्तीच्या हातामुळे त्यांच्या आईला व्यवस्थित बसता येत नव्हतं त्या, व्यक्तीला हात बाजूला घेण्यास सांगितल्यावर त्याने शालिनी यांना आली मोठी अधिकारी असं म्हंटलं. आणि हेच शब्द शालिनी यांच्या मनाला लागले आणि त्यांनी मनातच ठरवले की, आपल्याला मोठं होऊन एक अधिकारी व्हायचं आहे.

मित्रांनो प्रयत्न केल्याने यश हे नक्की मिळतं. हेच आम्हाला या पोस्ट मधून तुम्हाला सांगायचं आहे.

Note:- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला @Dnyan_shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ