ट्विटरचे कर्मचारी ते सीएओ पराग अग्रवाल यांची दहा वर्षांची यशोगाथा | Success story of Parag Agrawal in marathi

पराग अग्रवाल यांची ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु झाली. पराग यांची नियुक्ती होऊन दोन दिवस झाले, तरी त्यांच्याबदद्लच्या बातम्या आणि चर्चा सुरुच आहेत. पराग यांनी ट्विटरमध्ये नोकरी सुरु केल्यापासून 10 वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली. हा दहा वर्षांचा प्रवास सोपा नव्हता. आज वर्तमानपत्र, न्यूज चॅनलमध्ये पराग यांना किती पगार मिळणार यावर बातम्या येतात. पगाराचा तो आकडा डोळे दिपवणारा आहे पण त्यामागची पराग यांची मेहनत, अभ्यास महत्त्वाची आहे. जेव्हा पराग यांनी ट्विटरमध्ये काम सुरु केलं होतं तेव्हा एक हजारापेक्षा कमी कर्मचारी होते. विचार करा ट्विटरवर दिवसाला लाखो वापरकर्ते भेट देतात. तो सगळा आवाका त्याचबरोबर तांत्रिक बाजू सांभाळणे आणि हाताशी कमी कर्मचारी, तरी पराग यांनी आपली कामगिरी चोख बजावली.

ट्विटरचे कर्मचारी ते सीएओ पराग अग्रवाल यांची दहा वर्षांची यशोगाथा | Success story of parag agrawal in marathi

पराग अग्रवाल यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मोठे झाले. मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ‘कम्प्युटर सायन्स’, पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. पराग अग्रवाल यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना ट्विटरचे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून बढती देण्यात आली. 2017 मध्ये ट्विटरने पराग अग्रवाल यांना मुख्य टेक्निकल अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असताना पराग अग्रवाल यांनी सुरूवातीला ट्विटरचे यूजर्स, महसूल व मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टेक्निकल स्ट्रेटजी आणि सुपरव्हिजन विभागांचे मुख्य अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. शिक्षण सुरु असतानाच कुशाग्र बुद्धी आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी याच्या बळावर याहु, गुगल अशा नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशीप पटकावली. इंटर्नशीप दरम्यान त्यांनी अनेक प्रयोग यशस्वी करून दाखवले.

‘आर्टिफिशिअल इंटिलीजन्स’ या विषयात त्यांचा हातखंडा असल्याने गुगलमध्ये त्यांनी नोकरीही मिळवली. काही वर्ष गुगलमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी 2011 साली ट्विटर कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. ट्विटर संस्थेत काम करताना पराग यांनी टेक्नॉलॉजीशी निगडित अनेक प्रयोग केले.आर्टिफिशिअल इंटिलिजन्समध्ये त्यांनी केलेल्या प्रयोगांचे नेहमीच कौतुक झाले. कोणत्याही समस्येचे उत्तर पराग हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देत असल्याने त्यांना टेक्नॉलॉजीचा गुरु म्हटले जायचे.

पराग अग्रवाल खूप हुशार आहेत यात प्रश्नच नाही. हीच हुशारी आणि चुणुक त्यांनी लहानपणी शिक्षण घेताना दाखवून दिली होती. पराग अग्रवाल यांनी JEE परीक्षेत त्यांना येणारी प्रश्नांची उत्तरे 40 मिनीटात सोडवली, त्यानंतर अतिरिक्त पुरवणीसाठीची मागणी केली. पण त्याठिकाणी उपस्थित पर्यवेक्षकांनी अतिरिक्त पुरवणी देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगितले. पण पर्यवेक्षकांच्या उत्तराने समाधान न झाल्याने ते पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले. पुन्हा एकदा सर्व सूचना बारकाईने वाचल्या. त्यामध्ये सर्व पुरवण्या या योग्य क्रमात बांधा अशी सूचना देण्यात आली होती. हीच सूचना वाचून ते पुन्हा पर्यवेक्षकांकडे गेले. त्यानंतर पुरवणी उपलब्ध करून देण्यात आली. पण दरम्यानच्या काळात खूपच वेळ वाया गेल्याचा मनस्ताप त्यांना झाला. अशा महत्वाच्या परीक्षेत मोलाचा वेळ वाया गेल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांना IIT-JEE परीक्षेत कोचिंग करणारे कोच प्रवीण त्यागी यांनी ही माहिती दिली आहे. IIT-JEE 2000 साली ही परीक्षा दिली होती.

शब्दांची मर्यादा कमी मात्र तरीदेखील अत्यंत प्रभावी असलेले माध्यम म्हणजे ट्विटर. सध्या ट्विटरचे स्पर्धक अनेक आहेत आणि त्यांच्या पुढे जाण्यासाठी ट्विटरला एका चांगल्या नेतृत्वाची गरज होती ती पराग अग्रवाल यांच्यामुळे नक्की पूर्ण होणार आहे. ट्विटरमध्ये पराग इंजिनियर म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर वरची पदे मिळवण्यास सुरूवात केली. 37 वर्षांचे पराग अग्रवाल तसे प्रसिद्धीपासून दूरच असतात. चांगली काम केली ती प्रसिद्धी नक्की मिळते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आता पराग यांची नियुक्ती सीईओपदी झल्यानंतर त्यांच्यावर प्रशासकीय स्वरुपाची जबाबदारी देण्यात आली आहे. सीईओ म्हणून पराग यांना ब्लूस्काय या प्रकल्पांवर काम करावे लागणार आहे. जॅक डॉर्सी यांचा हा अत्यंत लाडका प्रकल्प आहे. यामुळे ट्विटरचे स्वरुपच बदलून जाणार आहे. ट्विटरने आपली नवीन क्रिप्टो टीमदेखील स्थापन केली आहे. सध्या जबाबदारी घेतल्यावर पराग यांना ट्विटरच्या तांत्रिक बाबींवर लक्ष द्यावे लागणार आहे. कारण तंत्रज्ञानाच्या पातळीवर ट्विटर हे आपले प्रतिस्पर्धी असणाऱ्या फेसबुक, युट्युबपेक्षा मागे पडले आहे. ट्विटरचे दररोज लाखो वापरकर्ते आहेत. पराग यांनी ट्विटरच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले, आव्हानांना सामोरे गेले.

ट्विटरचे नवे सीईओ जाहीर झाल्यानंतर पराग यांनी माजी सीईओ जॅक डॉर्सी आणि इतर सहकाऱ्यांचे आभार मानले तेव्हा त्यांनी असे म्हटले, “पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात सध्या जग आपल्याकडे पाहत आहे. अनेकांचे विचार आणि दृष्टीकोन त्यात आहेत. कारण ट्विटर आणि आमच्या भवितव्याचा ते विचार करतात. त्यावरून आम्ही करत असलेल्या कामाला महत्त्व आहे, हे स्पष्ट होतं. तेव्हा आता आम्ही जगाला ट्विटरची संपूर्ण क्षमता दाखवू. ट्विटरचा सध्याचा आवाका खूप मोठा आहे. कॅलिफोर्निया येथील ऑफिसमध्येच हजारो कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टिम्स तसेच नवीन आव्हानांची जबाबदारी पराग यांच्या खांद्यावर आहे. सध्या जगभरातून पराग यांचा गौरव होतोय पण त्यात हुरळून किंवा गर्वाने फुलून न जाता सगळ्यांना सोबत घेवून ते काम करणार आहेत. एक भारतीय जगाला ट्विटरची क्षमता अधिक चांगल्या प्रकारे करुन दाखवणार आहे.

Note: जर तुमच्याकडे Biography of Parag Agrawal in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Parag Agrawal information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button