कोणी नोकरी दिली नाही, स्वतःच्याच चालू केल्या 20 कंपन्या…

मधुसूदन राव एका खूपच गरीब परिवारात जन्माला आले, त्यांचे आई-वडील अठरा-अठरा तास काम करायचे एवढं काम करूनही त्यांना कधी पोटभर जेवण मिळायचं नाही.
आज मधुसूदन राव यांच्या 20 कंपन्या आहेत ते एमएमआर ग्रुपचे फाउंडर आहेत. मधुसूदन यांचा जन्म आंध्र प्रदेश मधील एका छोट्याशा गावात झाला.

मधुसूदन यांच्या कुटुंबा बद्दल | Success Story Of Mannam Madhusudan Rao

त्यांचं पूर्ण नाव मन्नम मधुसूदन राव. राव हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते.जेव्हा मधुसूदन यांना थोडं काही समजायला लागले तेव्हा घरची परिस्थिती बघून रडू यायचे त्यांचे वडील एका जमीनदार व्यक्तीकडे वार्षिक मजुरी करायचे.मधुसूदन राव यांची आई एका तंबाखू फॅक्टरी मध्ये काम करायची. त्यांची मोठी बहीण पण आईला घरखर्चाला हातभार लागावा म्हणून आईसोबत कामाला जायची.

त्यांच्या गावात एक नियम होता की मागासवर्गीय जातीय लोकांनी गुडघ्याच्या खाली धोतर नाही घालायचं, हीच त्यांच्या गावात त्यावेळी मागासवर्गीयांची ओळख होती.
अशा वातावरणात त्यांच्या आई-वडिलांना मुलांना शिकवणं खूप अवघड होतं.

करिअर बद्दल थोडक्यात माहिती | Mannam madhusudan rao success story in marathi

कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी मधुसूदन यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. मधुसूदन अभ्यासात हुशार असल्यामुळे शिक्षक पण त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायचे, ते नेहमी परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास व्हायचे त्यांनी दहावी व बारावी परीक्षा झाल्यानंतर पॉलिटेक्निक साठी एंट्रन्स एक्झाम दिली आणि एक्झाम पास करून पॉलीटेक्निक कॉलेजला ॲडमिशन घेतलं.


पॉलिटेक्निक करण्या मागचं मधुसूदन यांचे कारण होतं की त्यांना वाटायचं की पॉलिटेक्निकल झाल्यानंतर लगेच त्यांना सरकारी नोकरी मिळेल पण तसं झालं नाही.
खूप दिवस नोकरी न मिळाल्यामुळे ते खूप निराश झाले नंतर ते पण भावासोबत मजुरी करू लागले त्या सोबतच ते सेक्युरिटी गार्ड चे पण काम करायचे, ओव्हर टाईम ड्युटी करून ते घर खर्च भागवायचे.

मधुसूदन यांना नंतर वाटायला लागले की अशी छोटी नोकरी करून घरची परिस्थिती बदलणार नाही. तेव्हा त्यांनी काहीतरी व्यवसाय करु असा विचार केला.
एकदा तर ज्या लोकांसोबत मिळून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता ते लोक सगळे पैसे घेऊन पळूनही गेले होते पण त्यांनी हार न मानता दुसऱ्या लोकांसोबत कंपनी चालू केली.
भरपूर लोकांसोबत काम केल्याने त्यांना हे समजलं की काही तुरळक लोकांवरच विश्वास ठेवायला पाहिजे.

हळूहळू यशाची शिडी चढत गेले आणि त्यांनी नंतर एम एम आर ग्रुप बनवला. या ग्रुपच्या आज टेलिकॉम आयटी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल फूड प्रोसेसिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात 20 कंपन्या आहे.

मित्रांनो करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण सर्व काही साध्य करू शकतो हे मधुसूदन यांनी दाखवून दिलं.

Note: जर तुमच्याकडे About Mannam Madhusudan Rao यांच्या बद्दल अजून माहिती असेल आणि दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Mannam madhusudan rao success story in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि twitter वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button