Boat कंपनीचे CMO अमन गुप्ता यांच्या बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहे का? | Success story of Aman gupta in marathi

आपल्या भारत देशातील तरुण-तरुणींना आजच्या काळात सर्वात जास्त भुरळ आहे ती म्हणजे स्मार्ट गॅजेट्स, हेडफोन्स, इयरफोन्स. विशेष म्हणजे ही भुरळ पाडण्यात एक भारतीय कंपनी यशस्वी झाली आहे. आणि ती कंपनी म्हणजे BOAT. त्यामुळे बोट कंपनीचे उत्पादक आपल्यापैकी कोणी वापरले नाहीत किंवा त्या उत्पादक बद्दल कोणी ऐकले नाही असे कोणी आपल्याला शोध घेऊनही सापडणार नाही.

मग ज्या ठिकाणी बोट ( BOAT) कंपनीचे नाव आले त्या ठिकाणी अमन गुप्ता (Aman gupta) यांचेही नाव प्रामुख्याने यायलाच हवे. अनेक नकारात्मकता सहन करून समोर आलेले नाव म्हणजे बोट कंपनीचे CMO अमन गुप्ता.

जाणून घेऊया अमन गुप्ता यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल |Success story of aman gupta

आपल्या भारत देशातील आघाडीची ऑडिओ उत्पादन कंपनी बोट (BOAT) व त्या कंपनीचे 40 वर्षीय सीएमओ (CMO) अमन गुप्ता यांना लहानपणापासून उद्योजक व्हायचे होते. अमन गुप्ता यांनी सर्वात आधी दिल्ली विद्यापीठ मग ICAI आणि त्यानंतर अमेरिका येथून आपले शिक्षण पूर्ण केले.

अमन गुप्ता यांचा जन्म 4 मार्च 1982 मध्ये राजधानी दिल्लीत झाला. पेशाने अर्थात व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट अमन गुप्ते यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पदवीधरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर अमन गुप्ता उच्च शिक्षणासाठी युएसए येथे गेले.

अमन गुप्ता यांच्या वडिलांचे नाव नीरज गुप्ता आणि आईचे नाव ज्योती कोचर गुप्ता आहे. अमन गुप्ता यांच्या पत्नीचे नाव प्रिया डांगर आहे. या जोडीला मीया गुप्ता आणि अदा गुप्ता या दोन मुली आहेत.

अमन गुप्ता यांच्या करिअर बद्दल माहिती? | Aman gupta career information in marathi

अमन गुप्ता यांची मार्च 2003 मध्ये सिटीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर पुढे चालून अमन गुप्ता यांनी Advance telemedia private limited ची सहस्थापना केली आणि 2005 ते मार्च 2010 पर्यंत सीईओ म्हणून काम केले. 2011 च्या दरम्यान अमन गुप्ता यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. 2011-2012 पर्यंत अमन गुप्ता यांनी केएमपीजी (KMPG) मध्ये वरिष्ठ व्यवस्थापन सल्लागार म्हणून यशस्वी काम केले.

2016 मध्ये अमन गुप्ता यांनी समीर मेहता सोबत Boat ची संयुक्तपणे स्थापना केली. सध्याच्या घडीला अमन गुप्ता बोट (Boat) या कंपनीचे सीएमओ (Cmo) म्हणून काम करत आहेत. Boat ही ऑडिओ उत्पादनाच्या व्यवसायात गुंतलेली भारतीय आघाडीची ऑडिओ कंपनी आहे. बोट या कंपनीने सुरुवातीचे दोन वर्ष इयरफोन,हेडफोन,स्पीकर आणि चार्जर केबलची विक्री केली. Boat ही कंपनी भारतातील तरुणांमध्ये झपाट्याने आपले स्थान निर्माण करत आहे.

हे सुध्दा वाचा:- ट्विटरचे कर्मचारी ते सीएओ पराग अग्रवाल यांची दहा वर्षांची यशोगाथा

नुकत्याच झालेल्या ‘शार्क टॅंक शो’ मध्ये अमन गुप्ता आणि जज म्हणून काम केले आहे. अमन गुप्ता यांची शिप्रॉकेट, बमर,10 क्लब यांसारख्या स्टार्टअप मध्येही भागीदारी आहे. अशा प्रकारे अमन गुप्ता यांची एकुण संपत्ती $95 दशलक्ष आहे. म्हणजे भारतात याची किंमत 718 करोड एवढी आहे.

Note: जर तुमच्याकडे Biography of Aman gupta in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Aman gupta information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button