घशाच्या त्रासापासून त्रस्त आहात? मगं हे उपाय नक्की करा | Sore Throat Home Remedies in marathi

वातावरण बदलल्यानंतर खूप जणांना घसा दुखणे, घशात खवखव होणे असे त्रास होतात. त्यावर तुम्ही घरगुती उपायांनी मात करू शकता.

घशाच्या त्रासापासून त्रस्त आहात? मगं हे उपाय नक्की करा | Sore Throat Home Remedies

गरम पाणी

पाणी थोडेसे गरम करून ते हळू हळू पित राहा. त्यामुळे घशाला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घशाला गरम पाण्यामुळे शेक मिळण्यास मदत मिळते. टॉन्सिलचा त्रास जाणवू लागल्यानंतर तुम्ही गरम पाण्याचे सेवन करा. ग्लासभर पाणी पिण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घोट-घोट गरम जमेल तेवढे पाणी प्यायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

गुळण्या करा

गुळण्या करणे हा घशाच्या कोणत्याही समस्यासाठी रामबाण उपाय आहे. भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यामध्ये साधारण चमचाभर मीठ घाला. मीठ घातलेल्या पाण्याने गुळण्या करा मिठामध्ये बॅक्टेरिया मारण्याचे गुणधर्म असतात महत्त्वाचे म्हणजे गुळण्या केल्यामुळे ही आराम मिळतो.

मध- हळदीचे चाटण

घसा दुखत असल्यास मध- हळद एकत्र करून केलेले चाटण हा सुद्धा एक चांगला रामबाण उपाय आहे. एका वाटीत थोडे मध-हळद घेऊन त्याचे चाटण करावे. हे चाटण थोड्या थोड्या वेळाने घेत राहावे.

वाफ घेणे

घसा दुखत असल्यास तुम्ही वाफ घेऊ शकता (पाणी गरम करून तुम्ही जशी चेहऱ्याला वाफ घेतात तसेच घशासाठीही वाफ घेता येते) पाणी गरम करून त्यामध्ये तुम्ही मीठ घातले तरी चालेल. एखाद्या जाड टॉवेलच्या साह्याने तुम्हाला चेहरा झाकून तोंड उघडून घशात वाफ घ्यायची आहे.

हळदीचे दूध

अनेक आजारावर हळद रामबाण उपाय आहे.टॉन्सिल्सच्या बाबतीत घशाला आलेली सूज घालवायची असेल तर हळदीच्या गरम दुधाचे सेवन करा. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफुगल अशी हळद दुधातून घेतल्यामुळे त्याचा भरपूर फायदा मिळतो.

चहा आणि मध

चहा करून त्यामध्ये तुम्ही साधारण चमचाभर मध घाला. जितकं शक्य असेल तितकं गरम चहा प्या. म्हणजेच गरम चहाच्या सेवनाने तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. मधामध्ये असलेले अँटीबॅक्टरियल घटक घशाची सूज घालण्याचे काम करतात.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *