मित्रांनो खारटपणा हा मिठाचा स्थायिभाव आहे. टिकाऊपणा हा मिठाचा आणखी एक गुणधर्म आहे. जेवणामध्ये मीठ (salt) हा अत्यंत आवश्यक घटक आहे. मिठाशिवाय जेवण ही कल्पना कुणी सहन करू शकत नाही. मीठ हा ‘सर्व मसाल्यांचा राजा’ आहे. अन्न टिकवण्यासाठीही मिठाचा वापर होतो. अन्न, लोणी, मांस आदी पदार्थ टिकावेत म्हणून त्यात मीठ घालून ठेवतात.
मिठाचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Salt health benefits in Marathi
- मीठ जड, खारट, कफकारक, वायुनाशक, अग्रीप्रदीप्त व कडवट असते.
- गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. टॉन्सिल्स वाढणे, गळा दुखणे,
- घसा खवखवणे, गळ्याला सूज येणे आदी विकारांमध्ये फायदा होतो.
- कोरडा खोकला येत असल्यास मिठाचा छोटासा खड़ा दातात ठेवावा.
- गरम पाण्यामध्ये मीठ घालून प्यायल्याने उलटी होऊन त्यावाटे पित्त व कफ बाहेर काढता येतो.
- हिरड्यांना सूज आली असेल किंवा दाढ दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
- मीठ व बाभळीच्या कोळशाने दात घासले असता दात स्वच्छ होतात.
- मीठ व हळद पाण्यात वाटून लावल्यामुळे मुकामार लागलेल्या जागेवरील पीड़ा कमी होते.
- मीठ तव्यावर लालसर भाजावे. अर्ध्या चमचा मिठात थोडे गरम पाणी घालून घेतल्याने अपचन, विषमज्वर आदींमध्ये फायदा होतो.
- मिठाबरोबर मिरे वाटून खाल्ल्याने उलटी बंद होते.
- मधमाशीच्या किंवा विंचवाच्या दंशावर मीठ चोळल्याने आराम मिळतो.
- सुकलेला कफ मोकळा होऊन पडण्याकरिता छातीवर तेलाने मालीश करावे. त्यानंतर मीठ थोडे गरम करून पुरचुंडीमध्ये घालून छातीवर शेकले असता कफ मोकळा होण्यास मदत होते.
- जखम न चिघळता लवकर भरून यावी म्हणून मिठाच्या पाण्यात भिजवलेली पट्टी जखमेवर बांधावी.
- सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडे मीठ घालून रोज प्यायले असता पोटातील कृमी बाहेर पडतात व नवीन कृमी निर्माण होणे बंद होते.
हे सुध्दा वाचा:– वेलची खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- ओवा व मीठ चावून खाल्ल्याने पोटदुखी बंद होते.
- आले व लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून सकाळी संध्याकाळी घेतले असता अपचनामुळे होणारी पोटदुखी, गॅसेस होणे बंद होते. प्रमाण कमी होते. पचनक्रियाही सुधारते.
- कोमट पाण्यात थोडे मीठ घालून रोज रात्री प्यायल्याने मलावरोध दूर होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो तसेच आतडी साफ होऊन मलशुद्धीही होते.
- लिंबाच्या रसात मीठ घालून दातांना चोळल्यास दात स्वच्छ होतात.
- मिठाचे पाणी गाळून त्याचे थेंब अर्धशिशीच्या विकारांनी त्रस्त असणाऱ्यांनी आपल्या नाकपुडीमध्ये घालावेत.
- तळपायांना भेगा पडल्यास थंड पाण्यात मीठ टाकून त्यात थोडा वेळ पाय बुडवून ठेवावेत.
- सुंठ भाजून मिठाबरोबर खाल्ल्यास पोटातील वायूचा जोर कमी होतो.
- जिभेवरचा चिकटा जाण्यासाठी जिभेवर थोडे मीठ घासावे.
- जिभेच्या मागल्या बाजूस थोडेसे मीठ ठेवल्याने उचकी बंद होते.
- मिठाच्या अतिरेकी सेवनामुळे आमाशयात दाह निर्माण होतो, त्वचेचे विकार, लोहविकार, डोके दुखणे, मूत्ररोग आदींचा त्रासही होतो.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.