मित्रांनो आज आपण पोस्ट मध्ये रशिया या देशाबद्दल काही आश्चर्यजनक गोष्टी जाणून घेणार आहोत.
रशिया देशाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Amazing facts about russia in marathi
- रशिया (Russia) अर्थात रुस हा जगातील सर्वात मोठा देश आहे. आकाराच्या दृष्टीने तो आपल्या भारत देशाच्या पटीहून ठेवून अधिक आहे.
- जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये रशिया या भाषेचा समावेश आहे. विशेष म्हणजे रशियन नागरिक लॅटिन अल्फाबेट्स वापरण्याऐवजी सिरिलिक अल्फाबेट्स वापरतात.
- रशिया हा देश जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी असलेला एक देश आहे. युनायटेड स्टेटच्या तुलनेत रशिया हा देश जवळपास 1.8 पट मोठा आहे.
- मॉस्को हे रशियातील सर्वात मोठे शहर असून, हे शहर रशिया या देशाची राजधानी आहे.
- 12 जून हा दिवस रशिया दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
- रशिया या देशात एकूण 261.9 मिलियन मोबाईल फोन आणि 42.9 मिलियन लँडलाईन वापरले जातात. रशिया देशात कम्युनिकेशन यंत्रणा देणाऱ्या जवळपास 100 हून अधिक कंपन्या आहेत.
- जगाच्या पाठीवर जगातील कोणत्याही शहराच्या तुलनेत मास्को शहरात सर्वाधिक अरबपती लोक राहतात. सध्याच्या अहवालानुसार मास्को शहरात 74 करोडपती लोक राहतात.
- रशिया या देशाचे एकूण लोकसंख्या जवळपास 14.34 कोटी एवढी आहे.
हे सुध्दा वाचा:- जपान देशाबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
- रशिया या देशाची एकूण लोकसंख्येच्या जवळपास 73.8% हिस्सा शहरांमध्ये राहतो. रशिया देशातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये मॉस्को (लोकसंख्या 10.523 मिलियन) तसेच सेंट पीटर्सबर्ग या शहरात लोकसंख्या 4.575 मिलियन व नोवोसीबिसर्क या शहरात लोकसंख्या ( 1.39 मिलियन) आणि निजझिय नोवगोरोड लोकसंख्या (1.26 मिलियन) वास्तव्यास आहे.
- रशिया या देशाची सीमारेषाही एकूण 14 देशांशी संलग्न आहे. या देशात प्रामुख्याने उत्तर कोरिया, जॉर्जिया, चीन, युक्रेन, बेलारूस, पोलंड, लिथुनिया, लाटविया, नॉर्वे, फिनलँड यांचा समावेश आहे.
- मित्रांनो आपणास जाणून आश्चर्य होईल की रशियाची जमिनी सीमा म्हणजेच “लँड बॉर्डर” ही 20241 किलोमीटर इतकी लांब आहे. विशेष म्हणजे ही सीमा चीन या देशानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमिनी सीमा आहे.
- रशिया या देशाच्या पुरुषांचे सरासरी आयुष्यमान हे 64 वर्ष तर महिला वर्गाचे सरासरी आयुष्यमान हे 76 वर्ष आहे.
- रशिया देशाची अर्थव्यवस्था ही जगातील 8व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
- जगातील सर्वात मोठी रेल्वे लाईन रशिया या देशात आढळते. ट्रान्स सायबेरियन रेल्वे रोड हा रशियातील पूर्वेकडे मॉस्कोमध्ये जोडला गेला आहे.
Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.