जाणून घेऊयात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विषयी थोडक्यात माहिती |Pradhan mantri ujjwala yojana information in marathi

आपले केंद्रीय भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार देशातील गरिबी वर्गासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत. या योजनेसोबतच महिला वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठीही देशातील सरकार प्रयत्नशील आहेत

आपल्या भारत देशातील गरीब वर्गाला गॅस सिलेंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1 मे 2016 साली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) सरकारी आणि सरकारी बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलेंडरची सुविधा मोफत मिळते.

जाणून घेऊयात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विषयी थोडक्यात माहिती |Pradhan mantri ujjwala yojana information in marathi

प्रधानमंत्री उज्वल योजना काय आहे?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) सरकार समाजातील दारिद्र्यरेषेखालील आणि एपीएल कार्डधारक बांधवांना मोफत गॅस सिलेंडर देते. आतापर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आत्ताच्या घडीला मोदी सरकारने लाख करोडो महिलांना मोफत गॅस सिलेंडरची वाटप केले आहे. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त असावे.

या योजनेसाठी पात्रता काय आहे?

समाजातील दारिद्र रेषेखालील लोक प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभ घेऊ शकतात.या घटकातील लोकांकडे बीपीएल (दारिद्र रेषेखालील) शिधापत्रिका असावी. तसेच तुम्ही जर मागासवर्गीय किंवा वनवासी असाल तर तुम्ही प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • रेशन कार्ड
  • बीपीएल कार्ड

कागदपत्राच्या जोडणीसोबतच घरातील महिलेचे वय 18 वय अपेक्षा जास्त असावे, तसेच तुमचे बँकेत खाते असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यांच्या अधिकृत वेबसाईट https://www.pmuy.gov.in/ वर क्लिक करा आणि मग या ठिकाणाहून एक फॉर्म डाऊनलोड करा. त्यानंतर हा फॉर्म भरा आणि नंतर एलपीजी केंद्रात सबमिट करा. यानंतर तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल.

सध्याच्या केंद्रातील तात्कालीन मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. देशातील लाखो-करोडो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थी वर्गाला दिलासा देत तात्कालीन केंद्र सरकारने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) वर सबसिडी जाहीर केली आहे.

हे सुद्धा वाचा: स्टँड अप इंडिया योजना काय आहे? आणि नोंदणी कशी केली जाते? चला तर जाणून घेऊया

विशेष म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी तब्बल एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या निर्णयामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाची मुदत आज घडी पासून आणखी एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशातील 9.60 कोटी लाभार्थी वर्गाला आणखी एक वर्षासाठी प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थी अनुदानावर 12 सिलेंडर घेऊ शकतात.

योजने संबंधित काही प्रश्न

प्रश्न 1 – प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे?

उत्तर – उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिले जाते.

प्रश्न 2 – प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू झाली?

उत्तर – उज्ज्वला योजना 2016 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (केंद्र सरकार) यांनी सुरू केली होती.

प्रश्न 3- उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत पात्र लाभार्थी कोण आहेत?

उत्तर – गरीब कुटुंबातील आणि तिच्या घरात एलपीजी कनेक्शन नसलेली प्रौढ महिला उज्वला 2.0 अंतर्गत पात्र असेल.

प्रश्न 4- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाहे उद्देश काय आहे

उत्तर- स्वच्छ स्वयंपाक इंधन

प्रश्न 5- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फक्त BPL साठी आहे का?

उत्तर- अर्जदाराकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे आणि ग्रामीण रहिवासी असणे आवश्यक आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त करण्यासाठी अर्जदाराचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा बचत बँक खाते असणे आवश्यक आहे.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button