मित्र सकारात्मक असतील, तर आनंदाचा ताटवा बहरतो अर्ध्या भरलेल्या पेल्याला अर्धा रिकामा मानणारे नेहमी नकारात्मक विचार करतात. आयुष्यात मित्रही असे असतील, तर नकारात्मकता असणे स्वाभाविक आहे. नकारात्मक विचार करणारे, कामात मोडता घालणारे, चुकीचा सल्ला देणारे अशा मित्रांपासून दूर राहा. सकारात्मक विचार करणारे मित्र आयुष्य अधिक चांगले करतात. कसे, ते जाणून घेऊ….
पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी |Power of positive information in marathi
1.इस्त्रायलचे मानसशास्त्रज्ञ डॉ. शोधारिंगीजोनो
हे एका व्यापक अभ्यासाअंती या निष्कर्षाप्रत पोहचले, की चुकीचे मित्र निवडल्यामुळे आयुष्यातील आनंदाची पातळी ४५ टक्के कमी होते. आयुष्यातून ४५ टक्के आनंद कमी होणे म्हणजे घोर संकटात बुडण्यासारखे आहे. यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वाईट मित्रांना आपल्या आयुष्यातून खड्यासारखे दूर करा. त्यामुळे आनंद तुमच्याकडे स्वतःहून येईल.
2.ज्यांना मित्र नसतात किंवा कमी असतात, त्यांच्या आयुष्यात आनंद कमी असतो. ऑस्ट्रेलियातील स्टडी ऑफ एजिंगच्या मते, ‘आयुष्यात आनंद वाढवायचा असेल, तर मित्रांची संख्या वाढवा.’ संशोधकांनुसार, आनंद व आपला मूड आशादायी करण्यासाठी मित्रांची आवश्यकता असते.संशोधकांच्या चमूचे प्रमुख प्रो. लोफ फोर्ड म्हणतात, की कुटुंबातील सदस्य व मित्रांचे सख्य, आपलेपणा यामुळे आयुष्यावर विलक्षण प्रभाव पड़तो. जास्तीत जास्त मित्र सोबत असल्यास आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना खूप सहज सामोरे जाता येते.
3. संशोधकांना हे निष्कर्ष काढण्यासाठी जवळपास १० वर्षे लागली. या दरम्यान त्यांनी १५ हजारांहून अधिक लोकांचे निरीक्षण केले. अभ्यासातून त्यांना असे आढळले, की धन-संपत्ती, राहणीमानाची साधने या घटकांपेक्षा लोकांना आपले मित्र आणि कुटुंबात जास्त आनंद आणि विश्वास मिळतो.
4. मानसशास्त्रज्ञ डॉ. रिजवान वाही यांच्या मते, आपल्या मेंदूत मिरर न्यूट्रॉन्स असतात, जे आपल्याला दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव करून देण्यात मदत करतात. सायकियाट्री रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात, की आपल्या आसपास नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची गर्दी असेल, तर त्यांना दूर करा. अन्यथा ते तुम्हाला त्यांच्यासारखेच बनवतील. ,
• एम. के. मजुमदार यांच्या ‘३६५ दिन खुश कैसे रहे’ या पुस्तकातून साभार